शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३

नवीन पुस्तकांचे प्रदर्शन

पुस्तके वाचायला देणे, भाषणे करण्याची संधी देणे, यासरख्या व जेथे असे सुंदर विचार, वातावरण मुलांना मिळते तेथे डॉक्टर आंबेडकर 2रे, टिळक 2रे, न्यूटन 2रे निश्चित तयार होतील, असे उद्गार प्रा. राजकुमार यल्लावाड यांनी काढले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टोकवाडी संचलीत बाल वाचनालयाच्या वतीने नवीन पुस्तकांचे 3 रे पुस्तक प्रदर्शन आज येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा. यल्लावाड उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री निलेवाड तर अतिथी म्हणून श्री दिलीप तलवारे यांची उपस्थिती होती.
शासनाने दिलेल्या 10 हजार रुपयांच्या नवीन पुस्तकांचे प्रदर्शन शालेय मंत्रिमंडळाने आयोजित केले होते.
मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेचे सचिव प्रा. राजकुमार यल्लावाड यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. माता सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर फीत कापून पाहुणे प्रा. यल्लावाड यांनी उद्घाटन केले. सावित्री स्तवनचे श्रीमती जोशी रेखा यांनी गायन केले.
नव्या पुस्तंकाभोवती फुले, रांगोळी त्यांची सुंदर मांडणी हे आकर्षण होते. शाळेच्या बालवाचनालयाचे हे 3 रे पुस्तक प्रदर्शन. हे वाचनालय़ मुलेच चालवतात.
शालेय मंत्री मंडळची मुख्यमंत्री कुमारी पल्लवी काळे हिने सूत्रसंचालन केले.
सर्वाधिक पुस्तके वाचन केलेल्या 4 मुलांना पुस्तके भेट दिली गेली.
श्री प्रा. यल्लावड यांचे विचार मुलांना प्रेरणा देणारे होते.
आयोजन, संचालन, आभार, व्यवस्था करणारे शालेय मंत्रीमंडळाचे सदस्य होते.
शिक्षक सर्वश्री बाळासाहेब काळे, अनंत निकते, सोनेराव राठोड, पी. आर. राठोड, चंद्रशेखर फूटके, शिक्षिका श्रीमती महाजन, कराड, घाडगे, जाधव, चाटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.