सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

आरतीचा सन्मान गावकऱ्यांच्या उपस्थितीत





        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवून पात्र झाल्याबद्दल गावचे उपसरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या वतीने आयोजित नगर भोजन कार्यक्रमात आदरणीय  ह भ प श्री वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज  झोलकर  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन कुमारी आरती तुकाराम गुट्टे हिचा सन्मान करण्यात आला. गावात असणाऱ्या ग्रामदैवत श्री गोदमेश्वर मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपसरपंच श्री बंडू गुट्टे, मार्गदर्शक शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके व मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांची उपस्थिती होती. शेकडो ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आरतीचे कौतुक केले. अनेकांनी तिला 'फक्त शाळेतील शिकवणीवर' हे यश मिळवल्याबद्दल शाबासकी दिली.       पंचक्रोशीतील अनेक पुरुष, महिला भाविक मोठ्या संख्येने किर्तन व नगर भोजन कार्यक्रमास उपस्थित होते.   

बाल दिनानिमित्त आयोजित विविध मजेदार खेळ

     

उपसरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन 

बकेट बॉल गेम 












शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अर्थात बाल दिनानिमित्त वेगवेगळ्या अशा मजेदार स्पर्धांचे आयोजन केले होते. या सर्व खेळांची नियोजन मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी स्वतः केले. चार दिवस अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यामध्ये त्यांनी कोणते खेळ घ्यायचे, कोणाची जबाबदारी असेल, ते कसे घ्यायचे, त्यासाठी लागणारे साहित्य, खेळ घेण्याची जागा, खेळाची वेळ या सर्व बाबींचा विचार करून अतिशय सुंदर पद्धतीने आज खेळ घेतले. 

     सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार शिक्षणप्रेमी नागरिक श्री बंडू गुट्टे यांच्या हस्ते अर्पण केला व सर्व शिक्षक वृंदांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 

          पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विषयी शालेय मंत्रिमंडळाचे सदस्य चि श्रीनाथ गुट्टे आणि कोमल गुट्टे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री चि व्यंकटेश गुट्टे याने केले. 


   त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वर्गवार आयोजित झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेचा आनंद घेतला. संगीत खुर्ची संपल्यानंतर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बकेट बॉल स्पर्धा, बदकाला डोळा लावणे स्पर्धा, मटकी फोड स्पर्धा, शिवाजी म्हणतो पळापळा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रांगा लावून या वेगवेगळ्या स्पर्धांचा आनंद घेतला. प्रत्येक ठिकाणी यासाठी खास नियम बनवण्यात आलेली होती व छोटे छोटे बक्षीसही देण्यात येत होती. 


      शालेय मंत्रिमंडळांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड सहशिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, सरोजकुमार तरुडे, श्रीमती प्रिया काळे व शुभांगी चट यांनी त्यांचे अभिनंदन केले. 


_ चा राजा/राणी KING/QUEEN OF_

 


शालेय स्तरावरील, इंग्रजी, मराठी तसेच सेमी इंग्रजी माध्यमातील विविध स्पर्धा परिक्षांसाठी उपयोगी असलेली माहिती 


_ चा राजा / राणी   KING/QUEEN OF_  

● पक्ष्याचा राजा--------------------गरूड

     King of Bird/Sky         eagle (garud) 

● फुलांचा राजा--------------------गुलाब

     King of Flower                   rose 

● जंगलाचा राजा--------------------सिंह  

     King of Forest/jungle        Lion

● ऋतुंचा राजा----------------------वसंत

     King of Seasons              spring

● खेळांचा राजा--------------------कब्बडी

     King of Sport                  kabaddi 

● फळांचा राजा--------------------अंबा

     King of Fruit                  mango

● धान्याचा राजा ----------------------गहू 

  King of grains                 wheat

● वस्त्रांची राणी------------रेशीम वस्त्र.

  Queen of cloths                  silk


संकलन : श्री मनोहर होळंबे