रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
कासारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी कासारवाडीच्या सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली. विठ्ठल-रखुमाई आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये असणाऱ्या मुली, मुले, लेझीम पथक यामुळे प्रभात फेरीला शोभा आली होती. भारत मातेसह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या जय घोष करत विद्यार्थ्यांनी कासारवाडीला दणाणून सोडले.
प्रभात फेरी शाळेत परतल्यानंतर शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दलची गौरव असणारी गीते उत्कृष्ट नृत्य करत सादर केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्रीमती प्रिया काळे यांनी केले.
गावचे ग्रामसेवक श्री नागरगोजे यांच्यासह गावचे पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे आणि शाळेचे शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती दिली.
ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्व श्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी व श्रीमती शुभांगी चट यांनी मेहनत घेतली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)