शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

खमंग आनंद देणारी नगरी!

 वेगवेगळ्या उपक्रमातून आणि कृतीतून शिक्षण दिले जाते आणि विद्यार्थ्यांना ते अधिक आवडते, आनंद नगरी हा आनंद देणारा आणि शिक्षण देणारा उपक्रम! 











































शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी
 कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद नगरीचा आनंद घेतला आणि पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले; विविध खमंग पदार्थ खाऊन प्रोत्साहन दिले. 

बऱ्याच पालकांनी पदार्थांच्या बाबतीत मुद्दामून हिशोबाची तपासणी केली, पदार्थ कमी जास्त घेतले तर किमतीत काय फरक पडतो अशी ही चौकशी केली. 

याच आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षण होते गाढवाला शेपूट लावा आणि बक्षीस जिंका या खेळाचे! 

शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी या आनंदनगरीच्या दुकानांचे नियोजन केले होते. 

दही धपाटे, पोहे, गाजराचा हलवा, पाणीपुरी, पुरी भाजी, पाव भाजी, पेढे, बालूशाही, चहा, कचोरी, समोसा, वडापाव, मुरकुल, किराणा दुकान, फिल्टरचे पाणी, खिचडी, अप्पे, चिवडा अशा पदार्थांची रेलचेल या आनंद नगरीत होती.