आपल्या वक्तृत्वाच्या आणि अंगी असलेल्या अभ्यासपूर्ण गुणांच्या आधारे राजस्थानची एक दिवशीय मुख्यमंत्री झालेली कुमारी मंजुश्री सुरेश घोणे हिने आपल्या माता पित्यासह माझ्या घरी आज सदिच्छा भेट दिली.
मंजुश्रीने यावेळी आपण राजस्थानची मुख्यमंत्री कशी झालो ते सविस्तर सांगून हा एकूणच प्रवास किती समृद्ध करणारा आणि आनंददायी होता हे सांगितले. तिने किती बारकाईने विचार करून आणि पुस्तकांचा, इंटरनेटचा अभ्यासात उपयोग करून या पदापर्यंत पोहंचता आले हे सांगितले. एकंदरीत तिचा हा प्रवास थक्क करणाराच होता.
मुळची सोनपेठ जवळील डिघोळ येथील रहिवाशी असलेली मंजुश्री भरपूर वाचन, लेखकांशी गप्पा, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि सातत्याने चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कामांची माहिती घेत आपले जीवन अधिक समृद्ध करत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. सुमारे तासभर तिच्याशी झालेल्या गप्पांनी मलाही बऱ्याचशा नव्या गोष्टी माहित झाल्या.
हिंगोली जिल्ह्यातील आकाश पोपळघट याच्याशी झालेली चर्चा याबाबत ती बोलली आणि तो आता जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या असणाऱ्या अमेरिकेतील एमआयटी (Massachusetts Institute of Technology) येथे शिक्षण घेणार आहे. जगातून फक्त 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश या विद्यापीठात निश्चित केला जातो. त्यामध्ये भारतातून आकाश हा एकमेव विद्यार्थी आहे.
मंजुश्री सध्या जम्मू काश्मीर मध्ये उच्च शिक्षण घेत असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शाळेच्या विविध ऍक्टिव्हिटी पाहते, विद्यार्थी हितासाठी तुम्ही खूप काही करता असे तिने व तिच्या आईवडिलांनी यावेळी आवर्जून सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने मला प्रोत्साहन देत असता म्हणूनच तुमची भेट घेण्याची इच्छा झाली असे म्हणत तिने शेखर अंकलचे आशीर्वाद घेतले.
खूप खूप मोठी हो मंजुश्री, समाजकल्याण करण्याचे तुझे भान पाहता प्रशासनात मोठ्या पदावर विराजमान होऊन तुझे कार्य शिखरास जावो हिच आमच्या परिवाराची या दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा!!