फक्त 55 टक्के लोक हे वाचू शकतात! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फक्त 55 टक्के लोक हे वाचू शकतात! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २८ मार्च, २०२४

त्याच्या ज्ञानाचा होतोय सुंदर उपयोग!




 

आपल्या ज्ञानाचा उपयोग आपले दैनंदिन जीवन सुखकर, सुलभ करण्यासाठी केला तर ते ज्ञान अधिक फलदायी ठरेल.... आपल्या, कुटुंबातील सदस्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण मिळवलेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करायलाच हवा, आपल्या कुटुंबातील सर्वांचाच फायदा आपल्या ज्ञानामुळे होत असेल तर त्या ज्ञानाला आणि विद्यार्थ्यांना अधिक किंमत मिळेल...


परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धर्मापुरी रोडवर, मिरवट पाटीवर असणाऱ्या श्री केदारेश्वर रसवंती गृहात मी दररोज ऊसाचा रस घेत असतो. येथील ऊस अगदीच स्वच्छ दिसतो; तो स्वच्छ करण्याची मेहनत किती करत असतील याचा विचार मी करायचो.


आज थोडे अजब दृश्य डोळ्यासमोर दिसले. एका लोखंडी पाईपाच्या आतून या ऊसाला मागेपुढे केले जात होते आणि तो ऊस अगदी स्वच्छ होत होता! कुतूहल म्हणून मी जवळ जाऊन पाहिले. हे यंत्र काही कुठल्या कंपनीत तयार झालेले दिसत नव्हते, वीस पंचवीसच्या जवळपास वय असणाऱ्या त्या तरुणाला मग मी काही प्रश्न केले. त्याने आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. ऊस स्वच्छ करण्यासाठी करावी लागण्याची मेहनत सोपी करण्यासाठी त्याने लोखंडी पाईपाचा उपयोग करून व्हिडिओ मध्ये दाखवलेले हे साधे यंत्र स्वतः तयार केले आहे. 

धनंजय त्रिंबक भदाडे असे या कल्पक बुद्धीमत्ता असणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
कमी मेहनतीत अगदी स्वच्छ असा ऊस रसासाठी तयार होतो. त्याच्याशी पाच मिनिट गप्पा करून मी त्याचे कौतुक केले. तुझ्या शिक्षणाचा उपयोग तुझ्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांसाठी महत्वाचा ठरत आहे, हे खूप छान आहे, असे दोन कौतुकाचे शब्द मी त्याच्याशी बोलले.
कुटुंबातली पुरुष मंडळी या रसवंतीत मेहनत घेताना दिसतात. 


आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मेहनतीची काळजी घेणे म्हणजे एक प्रकारे कुटुंबावरची माया, प्रेम दाखवणे असाही त्याचा अर्थ होतो. त्याने केलेले काम छोटे आहे पण कुटुंबाशी त्याची नाते अधिक महत्त्वाचे आहे.

*चंद्रशेखर फुटके, परळी वैजनाथ जिल्हा बीड*
93250 63512

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

असे लिहा साहित्यसम्राट अण्णांचे यॊग्य पद्धतीने नाव !

 

साहित्यसम्राट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे नाव अनेक ठिकाणी चुकीचे लिहिलेले दिसते. "अण्णा" हे त्यांना मित्रांनी प्रेमाने दिलेले नाव... त्यांचे खरे नाव तुकाराम. वडिलांचे नाव भाऊराव आणि आडनाव साठे. काही ठिकाणी तुम्ही पाहता की लोक "अण्णाभाऊ साठे" असे लिहितात. असे लिहिणे चुकीचे होईल. 


आपण जर "अण्णा भाऊ साठे" असे वेगवेगळे नाव लिहिले तर पहिले नाव आदरणीय श्री तुकाराम यांचे टोपण नाव, दुसरे त्यांच्या वडिलांचे नाव तर तिसरे आडनाव होईल. म्हणून या तीनही नावांच्या मध्ये अंतर असणे आवश्यक आहे. यापुढे ही काळजी आपण घ्यायला हवी. आदरणीय अण्णांचे पूर्ण नाव श्री तुकाराम भाऊराव साठे (अण्णा भाऊराव साठे) असे लक्षात ठेवायला हवे. 

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

फक्त 55 टक्के लोक हे वाचू शकतात!


 फक्त ५५ टक्के लोक हे वाचू शकतात! 
आपला मेंदू किती सामर्थ्यवान आहे आणि सतत उजळणी केल्याने (विशिष्ट शब्द सातत्याने आपल्या डोळ्यासमोरून गेल्याने) त्याचे चित्र मेंदूने कसे संरक्षित केलेले असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरील चित्र आहे. यातील शब्दांच्या ज्यांच्या स्पेल्लिंग पूर्वी पक्क्या आहेत (खूपदा नजरेसमोरून गेल्या आहेत)  त्याच विद्यार्थ्यांना किंवा इतरांना हे सहज वाचता येईल... 😁 मजेशीरच आहे नक्की....😃 आपल्या मेंदूची अद्भुत शक्ती दाखवणारे! 


स्पेलिंग महत्वाच्या नाहीत असा समज काहींचा होऊ शकतो परंतु माझ्या मते ज्यांनी यातील एकही मूळ शब्द (योग्य स्पेलिंगसह) यापूर्वी पाहिलेला नसेल त्यांना हे वाचता येईल का? दोन्ही प्रयोग करून तर पहा!! आपले मत कमेंट मध्ये (टिप्पणी) वाचायला आवडेल!!  

सोमवार, १५ ऑगस्ट, २०११

काव्यांजली _ मराठी चारोळ्या. प्रेरणा देणारी चारोळी शाळेच्या फलकावर मुलांसाठी दररोज लिहिली जात होती.

                                                            

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहारी या शाळांमध्ये दररोज प्रेरणा देणारी मराठी चारोळी लिहिली जात होती. काही वेळा त्या फलकाचे फोटो घेतले गेले. त्याचा हा संग्रह काव्यरसिकांना निश्चितच आवडेल अशी अपेक्षा करतो. अनेक मान्यवर कवी/कवयत्री यांच्या या चारोळ्या आहेत.  








  1.                                                 

  2.  



  3.  


  4.