मंगळवार, १९ मार्च, २०२४
काय काय शिकले मुले? पेपर क्राफ्ट: किल्ला बनवणे स्पर्धा
"माझ्या जवळचा काळा रंग संपला तेव्हा मी कोळसा कुटून तो रंग तयार केला; आणि जेव्हा पांढरा रंग संपला तेव्हा घरात असलेल्या चुन्याचा वापर केला" जेव्हा पाचवी मधील पूनम हे सांगत होती तेव्हा लक्षात आले की मुलांना जेव्हा आयुष्यात अडचणी येतील तेव्हा नक्कीच त्यावर मार्ग शोधण्याचे संस्कार अशा छोट्या स्पर्धा मधून होतात.
Write Correct Articles! लिहा योग्य उपपदे!
A, an the हे तीन articles नेहमी Nouns च्या अगोदर काही नियमानुसार वापरले जातात.
1) उच्चारानुसार consonants अर्थात व्यंजन अक्षराने सुरू होणाऱ्या noun च्या अगोदर a article वापरतात. a cat, a bat, a lion. (u या स्वराचा उच्चार हा अ असेल तिथे an व इतर ठिकाणी a वापरतात. उदा. an umbrella आणि a unity, a university)
2) उच्चारानुसार vowel अर्थात स्वर अक्षराने सुरू होणाऱ्या noun च्या अगोदर an हे article वापरतात. (a, e, i, o, u हे इंग्रजी भाषेतील पाच स्वर आहेत) व्यंजन सुरुवातीला असूनही काही शब्दांचे उच्चार स्वराने (नंतर असलेला) होतात म्हणून त्यांनाही an वापरतात. उदा. an honest.
3) जगात एकमेव असणारे noun, तसेच वाक्यात यापूर्वी ज्या noun चा उल्लेख झाला आहे आणि परत एकदा ते noun आले आहे अशा वेळी The या article चा वापर करतात.
चला तर मग, द्या ही परीक्षा आणि तपासा तुमचे ज्ञान!
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)