आलंकारिक शब्द सराव परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आलंकारिक शब्द सराव परीक्षा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १२ मार्च, २०२४

Jumbled Words! द्वितीय सत्र परीक्षेचा करू या सराव !




तुमच्या ओळखीच्या शब्दातील अक्षरे एका खोडकर मुलाने इकडे - तिकडे केली आहेत. त्या अक्षरांना त्यांच्या योग्य जागा दिल्या की होतील तुमच्या ओळखीचे शब्द तयार! द्वितीय सत्र परीक्षेचा करू या सराव ! 

  1. शब्दातील सर्व अक्षरे झाल्यानंतर स्पेस देऊ नका.
  2. सर्व अक्षरे स्मॉल लिहा. 




रविवार, १० मार्च, २०२४

चला नीट लिहा बरं ही वाक्ये!


 

Present Tense and Present Continuous Tense मधील चुकलेली वाक्य दुरुस्त करताना तुमचा छान अभ्यास होईल. 

मंगळवार, १८ जुलै, २०२३

सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण



 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी सुंदर हस्ताक्षर व इंग्रजी सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. 








विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून दुसऱ्या व चौथ्या शनिवारी शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. 

शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहे.   

शनिवार, ७ जानेवारी, २०२३

8 वी स्कॉलरशिप : मराठी - नामे सराव परीक्षा

 


लवकरच (फेब्रुवारी 2023) होणाऱ्या ८ वी स्कॉलरशिप परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील नामे सराव परीक्षा. 

गुगल फॉर्मच्या मद्तीने होणाऱ्या या प्रकारच्या सराव परीक्षा आमच्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत ज्यातून तुमचा सराव चांगल्या प्रकारे होईल.

चुकलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून घ्या आणि अभ्यास करून काही दिवसांनी पुन्हा सराव करा.

या ब्लॉगची लिंक आपल्या मित्र/मैत्रिणी, नातेवाईक यांना पाठवण्यास विसरू नका. NMMS च्या सराव परीक्षाही या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.


शब्दसमूहाबद्दल एक शब्द : सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा 👇 https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post.html


मराठी विषयातील पारिभाषिक शब्द सराव परीक्षा साठी येथे बोट ठेवा 👇 

https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_4.html 


आलंकारिक शब्द सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇

https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_7.html


मराठी विषयातील साहित्यिकांची टोपण नावे व त्यांची ग्रंथ संपदा याबाबत सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇

https://www.shekharphutke.in/2022/12/blog-post_14.html 


सर्वनामे सराव परीक्षा याबाबत सराव परीक्षेसाठी येथे बोट ठेवा 👇

https://www.shekharphutke.in/2023/01/8.html 

गुरुवार, २९ डिसेंबर, २०२२

इयत्ता 5 वी स्कॉलरशिप सराव परीक्षा : गणित - अपूर्णांक


 
इयत्ता 5 वी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सराव परीक्षा : गणित - अपूर्णांक



रविवार, ४ डिसेंबर, २०२२

भन्नाट गाणे : म्हणी शिकवणारे

 

    हे भन्नाट गाणे मनोरंजन करणारे व सोबतच म्हणी शिकवणारे आहे ! एकदा आनंद घ्या दुसऱ्या वेळी वही पेन घेवून लिहिण्याचा प्रयत्न करा. गाण्यात असलेल्या सर्व म्हणीची उत्तरे लिहिण्यासाठी फार्म दिलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि सोपी परीक्षाही ! सबमिट केल्यानंतर तुमची उत्तरे चूक की बरोबर हे पण कळेल.

 
अशा पद्धतीने अभ्यास देण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला? या पेजच्या सर्वात खाली आपली प्रतिक्रिया देण्यासाठी "टिप्पणी पोस्ट करा" असे दिलेले आहे, आपली प्रतिक्रिया अपेक्षित आहे. 

या ब्लॉगवर NMMS तसेच 8th Scholarship साठी सराव परीक्षा उपलब्ध आहेत, "मुख्यपृष्ठ" असे दिसल्यानंतर बाजूला असलेल्या ">" चिन्हावर बोट ठेवा.  

  तुम्हाला मिळालेले एकूण गुण पाहण्यासाठी थोडे वरच्या बाजूला स्क्रोल करून View Score वर बोट ठेवा. तुम्हाला मिळालेले गुण आणि चूक/बरोबर उत्तरे दिसतील.