बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न!























































ताट सजावट आणि राखी बनवणे या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली असून शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या ताट सजावट आणि राखी बनवणे स्पर्धांचे बक्षीस वितरण वर्गशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
 
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंत्रिमंडळ सदस्य चि करण भागवत गुट्टे याने केले.  

नियमित अभ्यास आणि विविध स्पर्धा व त्यांची आकर्षक प्रमाणपत्रे व बक्षिसे मिळत असल्याबद्दल विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत. 


मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी.

 


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवाची मराठवाड्यात जय्यत तयारी. विविध कार्यक्रमांचे आयोजन.  १४ ते १७ सप्टेंबर होणार कार्यक्रम. 


14 सप्टेंबर रोजी बीड मुख्यालयाच्या ठिकाणी रॅलीचे आयोजन.

14 सप्टेंबर रोजी बीड वगळता सर्व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 7.15 वाजता दोनशे विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन.

विद्यार्थ्यांचा वैयक्तिक व सामूहिक गीत कार्यक्रम.

16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता 75 दीप प्रज्वलित करून मुक्तिसंग्रामातील महात्म्यांच्या प्रतिमांच्या रांगोळी काढण्याचे निर्देश.

17 सप्टेंबर रोजी ध्वजारोहण, प्रभात फेरी, विद्यार्थ्यांचे भाषण.


बीड शिक्षण अधिकारी यांनी काढलेले पत्रक. 


पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध उपक्रम, स्पर्धांचे तारीखनिहाय नियोजन असणारे पत्रक 


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव : विविध स्पर्धांचे पत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे बोट ठेवा