रविवार, २६ जानेवारी, २०२५
गुरुवार, २३ जानेवारी, २०२५
ऑलम्पियाड स्पर्धेत स्कॉलर केजी स्कूलचे घवघवीत यश
नॅशनल ओलंपियाड फाउंडेशन तर्फे घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल ओलंपियाड परीक्षेत यावर्षी प्रथमच सहभागी होत स्कॉलर केजी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण होऊन तेरा गोल्ड मेडल आणि एक टॉपर मेडल मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
स्कॉलर केजी स्कूल परळी वैजनाथच्या प्राचार्या सौ सुजाता चंद्रशेखर फुटके यांनी याविषयी अधिक माहिती देताना सांगितले की, आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच इंटरनॅशनल ओलंपियाड स्पर्धेत विद्यार्थ्यांना बसवले आणि त्यांची तयारी करून घेतली होती.
इंग्रजी गणित हिंदी विज्ञान फोनिक्स या विषयात विद्यार्थ्यांनी 13 गोल्ड मेडल्स एक टॉपर मेडल मिळवत एकूण 14 मेडल्स ची प्राप्ती केली आहे.
सर्वात कौतुकास्पद बाब म्हणजे कु राजलक्ष्मी परमेश्वर गुट्टे हिने विज्ञान विषयात 9 वा इंटरनॅशनल रँक मिळवला आहे! कुमारी राजलक्ष्मी हिने इंग्लिश, हिंदी, गणित फोनिक्स आणि विज्ञान या वेगवेगळ्या विषयांमध्ये ही स्पर्धा दिली आणि उत्तीर्ण झाली.
कु आराध्या अशोक रोकडे, काव्या अनिल शंकुरवार, ओवी विजय गायकवाड, पद्माक्ष योगेश व्यवहारे, शिवांश गजानन मालेवार आणि सौम्या जितेंद्र नव्हाडे या विद्यार्थ्यांनीही गणित आणि इंग्रजी विषयांमध्ये ए प्लस प्लस ग्रेड घेऊन सेकंड राउंड साठी सिलेक्ट झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षिकांचे अभिनंदन प्राचार्या सौ सुजाता फुटके व शाळेचे मार्गदर्शक श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले आहे.
शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५
एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत कासारवाडी शाळेचे यश
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या कला व संचलनालयाच्या वतीने आयोजित एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेत यश मिळवले असून 13 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षणासाठी स्वतंत्र शिक्षक नसतानाही या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती प्रिया अशोकराव काळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन तसेच मार्गदर्शन करून यावर्षी प्रथमच एलिमेंट्री ड्रॉईंग परीक्षेसाठी तयारी करून घेतली.
श्रीमती काळे मॅडम यांच्या प्रयत्नास प्रतिसाद म्हणून विद्यार्थ्यांनीही मेहनत केली आणि या गावातून पहिल्यांदाच अशा प्रकारच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या वर्गाचा एकूण पट १८ विद्यार्थ्यांचा आहे. त्यापैकी तेरा विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले असून तीन विद्यार्थिनी बी ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती प्रिया कळम काळे मॅडम यांचे मुख्याध्यापक श्री राठोड, सरपंच सौ उर्मिला बंडूभाऊ गुट्टे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह ग्रामस्थ व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.
.
रविवार, २९ डिसेंबर, २०२४
पैसे दिल्याचा डुप्लिकेट ॲप! व्यापाऱ्यांनो सावधान!
फोन पे सारखाच दिसणारा डुप्लिकेट ॲप सध्या निघाला असून त्यातून तुम्हाला फोनवरून पैसे दिल्याचे दिसत आहे परंतु प्रत्यक्षात तुमच्या खात्यावर काहीच पैसे आलेले नसतात.... पोलिसांनी तयार केलेला वरील व्हिडिओ पहा...
मंगळवार, १० डिसेंबर, २०२४
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेतला महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल विचार व्यक्त करून अभिवादन केले.
शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री असणाऱ्या इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा संदीप गुट्टे हिने केले.
सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन शालेय मंत्रिमंडळाच्या व शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
उपस्थित शिक्षकांचे स्वागत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने झाल्यानंतर प्रत्येक वर्गातील विद्यार्थी प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शिक्षकांच्या वतीने श्रीमती चट शुभांगी, श्रीमती प्रिया काळे आणि श्री चंद्रशेखर फुटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४
तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान......
तुमचे Whatsapp होईल हॅक! सावधान अशा प्रकारच्या फाईल ओपन करू नका!
सध्या व्हाट्सअप वर आपल्याच ओळखीच्या क्रमांकावरून एक फाईल पाठवली जाते आणि आपण ती उत्सुकतेने उघडून पाहतो आणि क्षणात आपल्या whatsapp वरून ताबा दुसऱ्याच कोण्याच्या हाती जातो! आपले सर्व क्रमांक, पर्सनल डेटा त्या व्यक्तीच्या हाती गेल्याने बऱ्याचदा आर्थिक नुकसान होते. समोरच्या व्यक्तीने मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी असे केलेले नसते तर नकळतपणे ती व्यक्ती अशा प्रकारे फसलेली असते आणि त्या मोबाईल मध्ये असणाऱ्या सर्व क्रमांकांना ही फाईल आपोआप पाठवली जाते...
कशी ओळखावी अशी फाईल?
कोणत्याही व्यक्तीला आपण संवाद न साधता त्याने आपल्याला ऍप्लिकेशन फाईल पाठवली असेल तर ते संशयास्पद असते. याच फाईल मध्ये आपला मोबाईल हॅक करणारी व्हायरस असतात. या फाईलची नवे काहीही शकतात आणि शक्यतो अशी जी आपल्या कामाची असू शकतात. जसे की PM किसान माहिती, लाडकी बहीण योजना, SBI Reward, मोफत डेटा अर्ज या प्रकारच्या फाईल.
या प्रकारच्या फाईलच्या शेवटी .APK (डॉट एपीके) असते. (चित्र पहा) अशा प्रकारची फाईल ओळखून कधीच Open करण्याची चूक करू नका.
आपला मोबाईल लहान मुले किंवा किंवा थोड्याच शिक्षित असलेल्या स्त्रियांच्या हाती देत असाल तर त्यांना ही माहिती वाचण्यास सांगा.
ही पोस्ट आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)