मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३

जिल्हा परिषद बीड आदर्श शिक्षक पुरस्कार

परळी तालुक्यातील नूतन परळी केंद्रात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी कार्यरत  असलेले श्री चंद्रशेखर शिवलिंगप्पा फुटके यांना जिल्हा परिषद बीड ने या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार नामदार जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला. पत्नी सुजाता सह श्री फुटके


शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

श्री चंद्रशेखर फुटके यांचा 'आदर्श शिक्षक' म्हणून सन्मान.

मराठवाडा साहित्य परिषद परळीच्या वतीने श्री चंद्रशेखर फुटके यांचा 'आदर्श शिक्षक' म्हणून सन्मान...श्री नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते

टोकवाडी फेस्टिवल


टोकवाडी फेस्टिवल अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कथाकथन, वक्तृत्व, शुभेच्छा कार्ड निर्मिती स्पर्धा संपन्न झाल्या...त्याची ही क्षणचित्रे..









रविवार, ८ सप्टेंबर, २०१३

मीना-राजू मंच

मुलेच का क्रिकेट नेहमी खेळतात...आज आम्ही खेळणार...पत्रावर बॉल गेला तर आम्हीच काढणार




गुरुवार, ५ सप्टेंबर, २०१३

बीड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक- श्री फुटके सर



बीड जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक- श्री फुटके सर
परळी तालुक्यातील नूतन परळी केंद्रात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे गेली दहा वर्ष आणि जिल्हा परिषदेत 18 वर्ष एकूण सेवा केलेले श्री चंद्रशेखर शिवलिंगप्पा फुटके, वय 38 वर्ष, शिक्षण- एम.ए.,बी.एड., गुणवंत शिक्षकांमध्ये अग्रभागी असलेले नाव.
 स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर 1888 हा त्यांचा जन्मदिन. संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा होतो. शिक्षण विभागात उत्कृष्ट काम करणार्‍या शिक्षकांचा यथोचीत सन्मान करण्याचा 5 सप्टेंबर हा दिवस. या वर्षी जिल्हा परिषद बीड तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार श्री फुटके सर यांना जाहीर झाला. परिसरातील शिक्षक, मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वाना आनंद झाला. मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या कार्याचा वृतांत देत आहे.
श्री फुटके सर हे गेली 20 वर्ष शैक्षणिक उत्कृष्ट काम करत आहेत. आपले विद्यार्थी बुधिमान व्हावेत ही त्यांची प्रामाणिक इच्छा. टोकवाडी शाळेत ते गेल्या 10 वर्षापासून इंग्रजी हा विषय शिकवत आहेत. हा आपण मानलेला अवघड विषय. विविध उपक्रम राबवून हा विषय ते विद्यार्थ्यांना सोपा करून सांगतात. गावातील पालकांच्या मागणीनुसार सेमी इंग्रजी 5 वी ते 7 वी वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागातील मुलांची इंग्रजी लक्षात घेऊन ते स्वइच्छेने एक तास जादा अध्यापण ते करतात. या साठी खास साहित्याची निर्मिती ते सतत करतात.
शाळेत आनेक शालेय उपक्रमचे नियोजन करून ते काटेकोर राबवण्यात सरांचा हातखंडा. कोणी काम करेल याची वाट न पाहता नेहमी सर्व कामात आघाडीवर. विद्यार्थीप्रिय शिक्षक. मध्यंतर असले तरी भोवती मुले असणारच.
शाळेचा परिपाठ व वाचनालय़ विभाग सक्रिय संभाळणारे शिक्षक. पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थ्याकडून फलकावर सुविचार, कविता, इंग्रजी शब्द, कोडे दररोज लिहून घेणे, भिंती रंगवणे (दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी शाळा विविध चित्रांनी रंगवली होती), वृक्ष लागवड, शालेय मंत्रीमंडळ, शैक्षणिक सहली, वार्षिक स्नेह संमेलन, पालक भेटी हे त्यांचे सतत चालू असणारे उपक्रम. विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवताना सहकारी न विसरता सामावून घेतात.
परळीत झालेल्या 71 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनसाठी बालकुमार विभागाचे ते सचिव होते. अंधश्रद्धा निर्मूलन शाखेची परळी येथे स्थापना त्यांनी केली. कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर, डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा वादसंवाद हा कार्यक्र्म्, आमवश्यच्या रात्री स्माशन सहल, विद्यार्थ्यांच्या प्रबोधन परीक्षा असे उपक्रम राबवले आहेत. त्यांना पुन्हा परळी समिती अध्यक्ष करण्यात आले आहे.
परळी येथील दैनिक मराठवाडा साथी साठी त्यांनी 1996 पासून 'शेखर अंकल' या टोपण नावाने विद्यार्थी मित्रांसाठी पुरवणी सुरू केली. ही पुरवणी फार लोकप्रिय झाली होती. परळी परिसरात ते 'शेखर अंकल' या नावाने ओळखले जातात. गोष्टी, गाणी, माहिती, चित्रे, कोडे, असे मुलांना आवडणारे भरपूर यात असायचे. बक्षीस रूपाने मुलांना पुस्तके भेट दिली जायची. वर्तमानपत्रात लेखनही त्यांनी केले आहे.
जिल्हा परिषद शाळा टोकवाडी ची वेबसाइट त्यांनी 2010 मध्ये केली असून त्यावर शाळेचे उपक्रम लोड केले आहेत. त्यास आजपर्यंत 1134 नेटकर्यांनी भेट दिली आहे. www.zpppstokwadi.blogspot.com
सरांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची द्खल घेऊन अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी त्यांना 18 पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.
या वर्षी जिल्हा परिषद बीडने याची द्खल घेऊन त्यांची 'आदर्श शिक्षक' म्हणून निवड केली आहे.
विद्या विनय देते आणि शिक्षण घेणारा त्यामुळे नम्र होतो. शिक्षकाला समाजात मान मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही शिक्षक मातापित्यापेक्षा मोठा असतो.
श्री फुटके सरला त्यांच्या भावी शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी माझ्या शुभेच्छा.

- श्री निकते अनंत सोपानराव, सहशिक्षक, जिल्हा परिषद शाळा टोकवाडी.