*अभिनंदन!* 💐 *अभिनंदन!!* 💐 *अभिनंदन!!!* 💐
*कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!*
मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून शिष्यवृत्तीस ती पात्र ठरली आहे.
ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील आरतीने अनेक अडचणींना तोंड देत उत्तम अभ्यास केला. शाळेत अतिरिक्त तासांना ती हजर असायची, विविध स्पर्धा - उपक्रमात भाग घेण्याची तिला आवड आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री गंगाधर बिरमोड, श्रीमती प्रिया काळे, श्री तरुडे सरोजकुमार, श्रीमती शुभांगी चट यांचे तसेच परळी वैजनाथ येथील शिक्षक श्री सौदागर कांदे यांनीही तिला मार्गदर्शन केले.
थिंकशार्प फौंडेशनने पुरवलेल्या टॅबचा उपयोग सरावासाठी खूप छान झाल्याचे आरतीने सांगून श्री संतोष फड यांचे आभार मानले आहेत.
आरतीच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे यांनी तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व सदस्यांनी तसेच सरपंच श्री खांडेकर, उपसरपंच सौ ऊर्मिला बंडू गुट्टे व ग्राम पंचायत सदस्य कासारवाडी यांनी अभिनंदन केले आहे.
*आरतीच्या पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!*
💐💐💐💐💐
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0
खुप खुप अभिनंदन आरती आणि सरजी आपलेही 💐💐🙏😊
उत्तर द्याहटवाखुप छान सरजी, आपण मन लावून परिश्रम घेता, त्यामुळे यश हे मिळणारच... पुनश्च आरतीचे आणि आपलेही अभिनंदन 💐💐🙏😊
उत्तर द्याहटवाThank you very much sir ji.... Following your path
हटवाभारीच...मनपूर्वक अभिनंदन
उत्तर द्याहटवाThank you
हटवा