जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील उपक्रम
![]() |
.jpeg)
परळी, दि
येथून जवळच असलेल्या मिरवट केंद्रातील कासारवाडी जिल्हा परिषद शाळेत शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. वर्षभरातील वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. आज महाराष्ट्र दिनी मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते सहा विद्यार्थ्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
स्कॉलरशिप नवोदय तसेच विशेष अशा अभ्यासक्रमावर आधारित शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने दर पंधरा दिवसाला वेगवेगळ्या स्पर्धांचा आयोजन केले जाते. या स्पर्धा दोन गटांमध्ये घेतल्या जातात. शालेय मंत्रिमंडळाचे स्पर्धा मंत्री या उपक्रमाचे रेकॉर्ड ठेवतात. शालेय मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य या स्पर्धेचे व्यवस्थित आयोजन व नियोजन करतात. वर्षभरातील स्पर्धांच्या आधारे शाळारत्न हा पुरस्कार दिला जातो.
आज महाराष्ट्र दिनी गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, उपसरपंच श्री लक्ष्मण गुट्टे, ग्रामसेवक श्री नागरगोजे तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे, उपाध्यक्ष श्री हनुमान देवकते, पोलिस पाटील श्री बाबुराव गुट्टे, श्री रामकृष्ण गुट्टे, श्री ज्ञानेश्वर गुट्टे, श्री महादू गुट्टे, श्री जयदीप गुट्टे, श्री अर्जुन दहिफळे, श्री सोपान गुट्टे, श्री अरुण खांडेकर आदी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता सहावी ते आठवी गटातून कु अमृता सोमनाथ गुट्टे, कु अंजली रामकिशन शेप, कु राधा अनंत गुट्टे तसेच तिसरी -चौथी गटातून कु समृद्धी सोमनाथ गुट्टे व कु पूनम बालासाहेब गुट्टे तसेच स्कॉलरशिप मध्ये इयत्ता पाचवीतून पात्र झाल्याबद्दल कु सुजाता धनराज दहिफळे ही शाळा रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमा अगोदर शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. इयत्ता पहिली प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडत्या गीतावर नृत्य केले. कागदी टोप्या डोक्यावर, हातात रंगीबेरंगी फुगे अशा छान वातावरणात पहिली देणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव भाऊराव राठोड यांनी तसेच शिक्षकवृंदानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा