यत्र- तत्र - सर्वत्र आम्हाला विद्यार्थ्यांचा विचार!
"साहेब, त्या माप घेतलेल्या कवळीचे नंतर तुम्ही काय करता?" माझ्या दातांचे माप घेऊन झालेल्या त्या दातांच्या पुतळ्यासारख्या आकारांकडे पाहत मी विचारले असता जैन डेंटल क्लिनिकचे डॉ दिनेश लोढा म्हणाले, "निरुपयोगी होतात ते " "मला द्या ना ते " " कशासाठी?" "मला मुलांना दातांची रचना कशी असते ते सांगता येईल आणि काळजी कशी घ्यावी तेही सांगता येईल " " मग माझ्याकडील मोठे मॉडेल घेऊन जा सर, दोन - तीन दिवसांनी परत द्या! "
मोठ्या मनाचे डॉक्टर दिनेश लोढा यांचे मनोमन आभार मानून दोन दिवस छान तयारी केली.
शाळेत मुलांना मॉडेलच्या मदतीने दातांची रचना, प्रकार, कार्य, काळजी कशी घ्यावी, दात कशाचे बनलेले असतात हे सांगितले (विज्ञान विषय) इंग्रजी नावे सांगितले (इंग्रजी विषय) दातावर आधारित वाक्प्रचार, म्हणी (मराठी विषय) ब्रश करताना सामान्य गोष्टी अशी सर्वांगीण माहिती दिली आणि गेल्या महिन्याभरापासून डॉक्टरकडे जात असलेला माझा वेळही विद्यार्थ्यांच्या कारणी लागल्याचे समाधान लाभले..... 4 सलग रुट कॅनाल केल्याची वेदना पार विरून गेली....
असा हा विचार अनेक शिक्षक करतात म्हणूनच त्यांचे विद्यार्थी गगनभरारी घेतात....
Khup chan Sirji
उत्तर द्याहटवाImportant for all students
हटवाThank you
हटवाविद्यार्थी जेवढं शिक्षकांचे ऐकत्तात तेवढं घरी कोणाचं ही ऐकत नाहीत.
उत्तर द्याहटवाम्हणून आपण सांगीलेल हे प्रस्त्याक्षिक अतिशय महत्वाचं आहे सर.
Thanks
हटवाखूप छान. कृती युक्त असल्या मुळे कायम स्मरणात राहील. अभिनंदन सर.👍💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवाThank you for your compliment!
हटवा