सोमवार, १७ जून, २०१३

शिक्षण प्रवेश उत्सव 2013

शाळेचा पहिला दिवस 17 जून 2013 हा शिक्षण प्रवेशौत्सव म्हणून साजरा झाला. प्रवेश दारावर मोठी रांगोळी, नव्या मुलांच्या हातात गुलाबाची फुले, ढोल-ताशा, प्रवेश दिंडी, हे चित्र खूप छान होते...सरपंच श्री दशरथ मुंडे, उपसरपंच श्री बालाजी मुंडे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष श्री वाल्मिक मुंडे व मान्यवर उप
स्थित होते.

मंगळवार, २६ मार्च, २०१३

होळी लहान करा...पोळी दान करा..

Add caption

आज आमच्या शाळेत होळी साजरी झाली...शाळे भोवतालचा कचरा गोळा करून...लाकूड जाळू नये..हे इंधन महत्वाचे आहे ...होळी लहान करा-पोळी दान करा, असे  श्री निकते सर यानी सांगितले..मुअ श्री निलेवाड, श्री काळे, श्रीमती बडे, श्री राठोड, श्री सूर्यवंशी,श्रीमती महाजन, श्रीमती वाघमोडे, श्रीमती शिंदे, श्रीमती कराड, श्रीमती वाघमारे, श्रीमती घाडगे, श्रीमती जाधव, यानी पूजा करून होळी पेटवली.. सर्व शिक्षक व शिक्षिका व मुले, मुली हजर होते...

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

स्वातंत्र्यदिनाची पूर्व तयारी





मुले मनातून कामाला लागली म्हणजे शाळेचे आंगण रमनीय होते...

श्रमाची भाषा कळावी
कळावे श्रमाचे मोल
घामातच जग जगते
हा संदेश अनमोल

छान वाटते की नाही ?