प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे...तयारी सुरू आहे...5 ते 7 वी मूले लेझीम, मुली टिपरी, 4 थी मुले-मुली डमब्लेस, 3 री झेंडा कवायत, 2 री फक्त मोकळे हात, 1 ली ला काय घ्यावे असा विचार केला आणि श्रीमती चाटे मॅडम यांनी रुमाल सुचवला..तरीही किमान 20 रुपये प्रत्येकी खर्च आला असता...वीटभट्टी कामगार मुले जास्त आहेत काय करावे असे विचार सुरू असताना श्रीमती महाजन मॅडम यांनी जुनी साडी वापरता येते हे सुचवले...घरी हा प्रस्ताव सांगितला आणि माझी पत्नी सुजाता ने आनंदाने एक छान साडी दिली.
सोमवार, १३ जानेवारी, २०१४
गुरुवार, ९ जानेवारी, २०१४
सोमवार, ९ डिसेंबर, २०१३
रविवार, ८ डिसेंबर, २०१३
शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३
चला दिवाळी ग्रीटिंग कार्ड बनवू या...
विद्यार्थ्यांच्या हातांना विविध आकार तयार करता येऊ लागले, त्यांच्या मनात कल्पकता घर करू लागली की शिक्षक मित्र आनंदी होतात ... शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मग मुलांच्या चेहऱ्यावर उमटू लागतो...
प्रथम सत्र परीक्षा झाली...दिवाळी सुट्टी लांबली..आता काय करावे?
चला दिवाळी ग्रीटिंग कार्ड बनवू या...
शाळेत मुलांनी बनवलेले कार्ड..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी... 2013
शनिवार, १२ ऑक्टोबर, २०१३
नवीन पुस्तकांचे प्रदर्शन
पुस्तके वाचायला देणे, भाषणे करण्याची संधी देणे, यासरख्या व जेथे असे सुंदर विचार, वातावरण मुलांना मिळते तेथे डॉक्टर आंबेडकर 2रे, टिळक 2रे, न्यूटन 2रे निश्चित तयार होतील, असे उद्गार प्रा. राजकुमार यल्लावाड यांनी काढले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, टोकवाडी संचलीत बाल वाचनालयाच्या वतीने नवीन पुस्तकांचे 3 रे पुस्तक प्रदर्शन आज येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा. यल्लावाड उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री निलेवाड तर अतिथी म्हणून श्री दिलीप तलवारे यांची उपस्थिती होती.
शासनाने दिलेल्या 10 हजार रुपयांच्या नवीन पुस्तकांचे प्रदर्शन शालेय मंत्रिमंडळाने आयोजित केले होते.
मराठवाडा साहित्य परिषद परळी शाखेचे सचिव प्रा. राजकुमार यल्लावाड यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. माता सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर फीत कापून पाहुणे प्रा. यल्लावाड यांनी उद्घाटन केले. सावित्री स्तवनचे श्रीमती जोशी रेखा यांनी गायन केले.
नव्या पुस्तंकाभोवती फुले, रांगोळी त्यांची सुंदर मांडणी हे आकर्षण होते. शाळेच्या बालवाचनालयाचे हे 3 रे पुस्तक प्रदर्शन. हे वाचनालय़ मुलेच चालवतात.
शालेय मंत्री मंडळची मुख्यमंत्री कुमारी पल्लवी काळे हिने सूत्रसंचालन केले.
सर्वाधिक पुस्तके वाचन केलेल्या 4 मुलांना पुस्तके भेट दिली गेली.
श्री प्रा. यल्लावड यांचे विचार मुलांना प्रेरणा देणारे होते.
आयोजन, संचालन, आभार, व्यवस्था करणारे शालेय मंत्रीमंडळाचे सदस्य होते.
शिक्षक सर्वश्री बाळासाहेब काळे, अनंत निकते, सोनेराव राठोड, पी. आर. राठोड, चंद्रशेखर फूटके, शिक्षिका श्रीमती महाजन, कराड, घाडगे, जाधव, चाटे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१३
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३
रविवार, ८ सप्टेंबर, २०१३
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)