सोमवार, १३ जानेवारी, २०१४

प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे...तयारी सुरू आहे...5 ते 7 वी मूले लेझीम, मुली टिपरी, 4 थी मुले-मुली डमब्लेस, 3 री झेंडा कवायत, 2 री फक्त मोकळे हात,  1 ली ला काय घ्यावे असा विचार केला आणि श्रीमती चाटे मॅडम यांनी रुमाल सुचवला..तरीही किमान 20 रुपये प्रत्येकी खर्च आला असता...वीटभट्टी कामगार मुले जास्त आहेत काय करावे असे विचार सुरू असताना श्रीमती महाजन मॅडम यांनी जुनी साडी वापरता येते हे सुचवले...घरी हा प्रस्ताव सांगितला आणि माझी पत्नी सुजाता ने आनंदाने एक छान साडी दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा