रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
कासारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी कासारवाडीच्या सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली. विठ्ठल-रखुमाई आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये असणाऱ्या मुली, मुले, लेझीम पथक यामुळे प्रभात फेरीला शोभा आली होती. भारत मातेसह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या जय घोष करत विद्यार्थ्यांनी कासारवाडीला दणाणून सोडले.
प्रभात फेरी शाळेत परतल्यानंतर शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दलची गौरव असणारी गीते उत्कृष्ट नृत्य करत सादर केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्रीमती प्रिया काळे यांनी केले.
गावचे ग्रामसेवक श्री नागरगोजे यांच्यासह गावचे पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे आणि शाळेचे शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती दिली.
ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्व श्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी व श्रीमती शुभांगी चट यांनी मेहनत घेतली.
गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३
My Father : An Essay. माझे वडील - निबंध. मेरे पिता। तीन भाषेतील एक निबंध
My Father
My name is …….. My father’s name is…….. His age is……. He is ……..
(Occupation). My father is my superhero.
He is tall and strong, and he always makes me feel safe. He has a big smile and
a kind heart. He works hard every day to take care of our family.
My father is also very smart. He knows a lot about many things,
and he teaches me new things every day. He helps me with my homework and tells
me stories about when he was a little boy.
My father is very funny too. He makes me laugh all the time with
his jokes and funny faces. He loves to
play games with me and take me to the park.
I love my father very much, and I know he loves me too. He
always tells me how proud he is of me and how much he loves me. I feel very
lucky to have such an amazing father.
माझे वडील
माझं नाव ..... आहे. माझ्या वडिलांचे
नाव .... आहे. त्यांच वय...... आहे. ते ..... व्यवसाय करतात. माझे वडील माझे सुपरहिरो आहेत. ते उंच
आणि सशक्त आहेत आणि ते मला
नेहमीच सुरक्षित ठेवतात. त्यांच्याकडे मोठं स्मित हास्य आणि दयाळू हृदय आहे.
आमच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते रोज मेहनत घेतात.
माझे वडील खूप हुशार आहेत. त्यांना
बऱ्याच गोष्टींबद्दल बरेच काही माहित आहे आणि ते मला दररोज नवीन गोष्टी शिकवतात.
ते मला माझ्या गृहपाठात मदत करताट आणि ते लहान असतानाच्या गोष्टी मला सांगतात.
माझे वडील खूप आनंदी असतात. ते आपल्या
विनोदांनी आणि गमतीदार चेहऱ्याने मला नेहमी हसवतात. त्यांना माझ्याबरोबर खेळ
खेळायला आणि मला पार्कमध्ये घेऊन जायला आवडतं.
मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करतो
आणि मला माहित आहे की ते देखील माझ्यावर प्रेम करतात. त्यांना माझा किती अभिमान
आहे आणि ते माझ्यावर किती प्रेम करतात हे ते मला नेहमी सांगतात. मी स्वतःला खूप
भाग्यवान समजतो की मला असे खूप चांगले वडील मिळाले.