शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

कासारवाडी येथे महावाचन उत्सव स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान


 

महावाचन उत्सव स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा तसेच शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे उत्साहात पार पडला.


इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महावाचन उत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण लिहावयाचे असते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या परीक्षणाचे वाचन करून रेकॉर्डिंगही त्यांच्या आवाजात करण्यात आली.  


शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने मासिक स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण याचवेळी करण्यात आले. प्रत्येक वर्गातून तीन विद्यार्थी यासाठी निवडले होते. इयत्ता पहिली दुसरीला रंगभरण तर वरच्या वर्गांसाठी चित्र काढून रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. 


यावेळी मुख्याध्यापक श्री डी. बी. राठोड तसेच श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रुजू झालेल्या कु पूजा शालीवान गुट्टे यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.  

























































गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

कासारवाडीच्या शाळेत शालेय मंत्रिमंडळाने केला शिक्षक दिन साजरा

 


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन अर्थात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 


इयत्ता तिसरी ते आठवीच्या शालेय मंत्रिमंडळात असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री राठोड आणि शिक्षकवृंदांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सोबत आणलेले पुष्प प्रतिमेस अर्पण करून अभिवादन केले. शालेय मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांनी प्रत्येक शिक्षकाचे आज शिक्षक दिनी स्वागत केले. 


यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक श्री राठोड तसेच व्यासपीठावर श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रुजू झालेल्या कु पूजा शालीवान गुट्टे यांची उपस्थिती होती. 


पाचव्या वर्गात शिकणारी कुमारी पूनम बालासाहेब गुट्टे, आठव्या वर्गात शिकणारी कुमारी अक्षरा सचिन गुट्टे तसेच सहाव्या वर्गात शिकणारी कुमारी श्रुती बालासाहेब दहिफळे यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय मंत्रिमंडळाचा सदस्य चि. राम नाथराव लव्हारे याने केले.  


मुख्याध्यापक राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले व कार्यक्रम संपला.


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  शालेय मंत्रिमंडळाची मुख्यमंत्री कु अक्षरा संदीप गुट्टे, उपमुख्यमंत्री कु वैष्णवी विठ्ठल गुट्टे, मंत्री राम नाथराव लव्हारे, बालाजी महेश गुट्टे, श्रेयस बालासाहेब दहिफळे, आदिनाथ माणिक गुट्टे, राजश्री अंकुश गुट्टे, ईश्वरी अर्जुन गुट्टे आणि शिवकन्या सुनिल गुट्टे यांनी परिश्रम घेतले. 







भाषणांची झलक येथे पहा