शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

कासारवाडी येथे महावाचन उत्सव स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा सन्मान


 

महावाचन उत्सव स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांचा तसेच शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट येथे उत्साहात पार पडला.


इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महावाचन उत्सव स्पर्धेत सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचे परीक्षण लिहावयाचे असते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या परीक्षणाचे वाचन करून रेकॉर्डिंगही त्यांच्या आवाजात करण्यात आली.  


शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने मासिक स्पर्धेतील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण याचवेळी करण्यात आले. प्रत्येक वर्गातून तीन विद्यार्थी यासाठी निवडले होते. इयत्ता पहिली दुसरीला रंगभरण तर वरच्या वर्गांसाठी चित्र काढून रंगवण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. 


यावेळी मुख्याध्यापक श्री डी. बी. राठोड तसेच श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्रीमती प्रिया काळे, श्रीमती शुभांगी चट आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत रुजू झालेल्या कु पूजा शालीवान गुट्टे यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.  

























































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा