शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२
My Daily Routine - Short Essay. माझी दिनचर्या - इंग्रजी छोटा निबंध.
Then I go to school on my bike at 9.30 am. It is 14 KM away from my house. I reach school before 10. We conduct Assembly of students on daily base. When students enter the classroom, I greet them. I find many joyful, different ways to teach my students every day. By watching the happy faces of my students, I don't know how time flies. I reach home around 5 pm.
गुरुवार, १० नोव्हेंबर, २०२२
चला शिकू Use of have and has!
Choose Has/Have चा वापर कोठे करावा ? उत्तर चुकले तर का चुकले हे सांगणारी सेटिंग केलेली आहे!
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२
कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!
*अभिनंदन!* 💐 *अभिनंदन!!* 💐 *अभिनंदन!!!* 💐
*कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!*
मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून शिष्यवृत्तीस ती पात्र ठरली आहे.
ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील आरतीने अनेक अडचणींना तोंड देत उत्तम अभ्यास केला. शाळेत अतिरिक्त तासांना ती हजर असायची, विविध स्पर्धा - उपक्रमात भाग घेण्याची तिला आवड आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री गंगाधर बिरमोड, श्रीमती प्रिया काळे, श्री तरुडे सरोजकुमार, श्रीमती शुभांगी चट यांचे तसेच परळी वैजनाथ येथील शिक्षक श्री सौदागर कांदे यांनीही तिला मार्गदर्शन केले.
थिंकशार्प फौंडेशनने पुरवलेल्या टॅबचा उपयोग सरावासाठी खूप छान झाल्याचे आरतीने सांगून श्री संतोष फड यांचे आभार मानले आहेत.
आरतीच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे यांनी तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे व सदस्यांनी तसेच सरपंच श्री खांडेकर, उपसरपंच सौ ऊर्मिला बंडू गुट्टे व ग्राम पंचायत सदस्य कासारवाडी यांनी अभिनंदन केले आहे.
*आरतीच्या पुढील यशासाठी हार्दिक शुभेच्छा!*
💐💐💐💐💐
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२
शासनाची राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा : अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2022

कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सूचना:एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही,असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व चित्र, शिल्प, खेळणी तयार करणे या कलाकृतींचे सोबत ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२२ या हॅशटॅगचा वापर करून दि.३० ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा .
पोस्ट Public असावी, ई- मेल पत्ता स्वत:चा नसेल तर पालक /शिक्षक यांचा ई -मेल वापरावा.
फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav/ या पोर्टल जाऊन करावी.
नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
ही नोंदणी करताना फेसबुक,इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी.
एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी. तसेच एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. कला उत्सव स्पर्धेमध्ये राज्य स्तरापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही.
आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे /पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
विद्यार्थ्यांच्या /पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
#kalautsavmah2022 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.
राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा सन 2022-23
शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२
राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची 'शेखर अंकलच्या' घरी सदिच्छा भेट!
आपल्या वक्तृत्वाच्या आणि अंगी असलेल्या अभ्यासपूर्ण गुणांच्या आधारे राजस्थानची एक दिवशीय मुख्यमंत्री झालेली कुमारी मंजुश्री सुरेश घोणे हिने आपल्या माता पित्यासह माझ्या घरी आज सदिच्छा भेट दिली.
मंजुश्रीने यावेळी आपण राजस्थानची मुख्यमंत्री कशी झालो ते सविस्तर सांगून हा एकूणच प्रवास किती समृद्ध करणारा आणि आनंददायी होता हे सांगितले. तिने किती बारकाईने विचार करून आणि पुस्तकांचा, इंटरनेटचा अभ्यासात उपयोग करून या पदापर्यंत पोहंचता आले हे सांगितले. एकंदरीत तिचा हा प्रवास थक्क करणाराच होता.
मुळची सोनपेठ जवळील डिघोळ येथील रहिवाशी असलेली मंजुश्री भरपूर वाचन, लेखकांशी गप्पा, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि सातत्याने चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कामांची माहिती घेत आपले जीवन अधिक समृद्ध करत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. सुमारे तासभर तिच्याशी झालेल्या गप्पांनी मलाही बऱ्याचशा नव्या गोष्टी माहित झाल्या.
हिंगोली जिल्ह्यातील आकाश पोपळघट याच्याशी झालेली चर्चा याबाबत ती बोलली आणि तो आता जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या असणाऱ्या अमेरिकेतील एमआयटी (Massachusetts Institute of Technology) येथे शिक्षण घेणार आहे. जगातून फक्त 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश या विद्यापीठात निश्चित केला जातो. त्यामध्ये भारतातून आकाश हा एकमेव विद्यार्थी आहे.
मंजुश्री सध्या जम्मू काश्मीर मध्ये उच्च शिक्षण घेत असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शाळेच्या विविध ऍक्टिव्हिटी पाहते, विद्यार्थी हितासाठी तुम्ही खूप काही करता असे तिने व तिच्या आईवडिलांनी यावेळी आवर्जून सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने मला प्रोत्साहन देत असता म्हणूनच तुमची भेट घेण्याची इच्छा झाली असे म्हणत तिने शेखर अंकलचे आशीर्वाद घेतले.
खूप खूप मोठी हो मंजुश्री, समाजकल्याण करण्याचे तुझे भान पाहता प्रशासनात मोठ्या पदावर विराजमान होऊन तुझे कार्य शिखरास जावो हिच आमच्या परिवाराची या दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा!!
बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२
हा वारसा असाच अखंड सुरु राहू द्या बाळांनो!
![]() |
अमृता सोमनाथ गुट्टे व तिच्या बहिणी दिवाळी सुट्टीत गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करताना |
मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२
म्हणींचा मजेदार खेळ!
सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२
इंग्रजी आणि मराठीतून शिका काळाचे प्रकार! पक्के लक्षात ठेवण्यासाठी काही आयडिया !
श्री चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके यांची मायक्रोसॉफ्ट इंनोवेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून निवड विद्यार्थी असताना मुलांना सतावणारा व्याकरणाचा प्रकार म्हणजे विविध काळ! एकदा मन लावून समजून घेतले आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा एकदा नजर टाकली (Revision) केले की हा भाग पक्का होत असतो... दिवाळी सुट्टीनिमित्त एकदा यावर नजर टाकून घ्या!
रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२
Similes काय असतात बरे? समजून घ्या आणि प्रश्नही सोडवा
शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२
विज्ञान सेंटरला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!
स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!
प्रत्येक घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न कसा करावा आणि आपल्या अवतीभवती असणाऱ्या, घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्या अनुकूल कसे करून घ्यावे किंवा आपण स्वतः त्याच्याशी कसे जुळवून घ्यावे, विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात किती आणि कसा उपयोग करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना केंद्राचे समन्वयक श्री विरभद्र देशमुख यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्येक प्रयोग समजावून सांगताना करून दिले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून व आपल्या खास शैलीतून सतत हसत खेळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना खूप आवडला.
शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड आणि शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.