Present Tense and Present Continuous Tense मधील चुकलेली वाक्य दुरुस्त करताना तुमचा छान अभ्यास होईल.
रविवार, १० मार्च, २०२४
शुक्रवार, ८ मार्च, २०२४
स्कॉलर केजी स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न - टीव्ही- मोबाईल टाळा ॲड. सौ गित्ते
टीव्हीवर चालणाऱ्या मालिका आणि मोबाईलचा अतिवापर यामूळे संसारामध्ये विसंवाद निर्माण होत आहेत त्यामुळे महिलांनी शक्यतो या वेळेचा सदुपयोग आपल्या कलेला वाव देण्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी - नवे काही शिकण्यात घालवावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट शुभांगी गित्ते यांनी केले.
स्कॉलर केजी स्कूल या ठिकाणी महिला दिनानिमित्त त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की टीव्हीवरील अनेक मालिका आपल्या संस्कृतीला धरून नाहीत. संसार करत असताना किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सामंजस्याने वागल्यास सर्व काही ठीक होते. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला पालकांनी आनंदाने हवेत फुगे उडवून कार्यक्रमाची सुरुवात केली. पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर ॲड शुभांगी गित्ते यांचे स्वागत स्पर्धेच्या परीक्षक सौ शोभा फुटके यांनी केले. शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी प्रास्ताविक केले. स्कॉलर केजी स्कूलमध्ये वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती देत त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
प्रमुख अतिथींच्या सविस्तर मार्गदर्शनानंतर महिला पालकांना आवडणारे खेळ होम मिनिस्टर अंतर्गत घेण्यात आले ज्यात संगीत खुर्ची, स्ट्रॉने डोक्यावर फुल तयार करणे, प्रश्न उत्तर फेरी, कलागुण सादर करणे यांचा समावेश होता. या स्पर्धेत सौ स्वाती जयवंत कौले यांनी प्रथम, सौ अमृता जितेंद्र नव्हाडे यांनी द्वितीय, तर सौ सोनाली गजानन बेंडे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.
काव्यवाचन स्पर्धेमध्ये सौ स्नेहा अमोल क्षीरसागर यांनी प्रथम, सौ शुभांगी महेश उदगीरकर यांनी द्वितीय तर सौ ज्ञानेश्वरी बोकन यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे परीक्षण सौ शोभा शांतलिंग फुटके व सौ प्राची प्रवीण फुटके यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ वर्षा लाड व सौ प्रणिता पाठक यांनी केले. आपले मनोगत व आभार प्रदर्शन सौ शोभा फुटके यांनी व्यक्त केले. यावेळी काही मजेशीर गेम घेण्यात आल्याने उपस्थित महिलांना आनंद वाटला.
कार्यक्रमास शाळेतील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रणिता पाठक, सौ प्रियंका कुलकर्णी, सौ राजश्री हलकंचे, सौ भाग्यशाली शिंदे, सौ सुनैना गुट्टे यांनी परिश्रम घेतले.
रविवार, ३ मार्च, २०२४
सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४
तुम्ही हे वाचू शकता का?
मी जे वाचत आहे ते मला समजू शकते यावर माझा विसश्र्वाच बसत नव्हता. मानवी मनाची अपूर्व शक्ती! केंब्रिज विपीठाद्यातील संधशोनुनासार, शतीब्दाल अक्षरे कोणत्या क्रमाने आहेत याने काही फरक पडत नाही, फक्त मत्वाहची गोष्ट म्हणजे शतीब्दाल शेटवचे अक्षर व पहीले अक्षर योग्य ठिकाणी असणे. उरिर्वत संपूर्ण गोंधळ असू शकते आणि तरीही आपण ते कोत्याणही सवामस्येशिय वाचू शकतो! कारण मानवी मन प्रत्येक अक्षर वाचत नाही तर संपूर्ण शब्द वाचते! आरश्चर्यकाक आहे ना!
जर तुम्हाला वरील उतारा वाचता आला नाही तर हे उत्तर आहे...
ReplyForward Add reaction |
I cdnuolt blveiee taht I cluod aulaclty uesdnatnrd waht I was rdanieg. The phaonmneal pweor of the hmuan mind! Aoccdrnig to a rscheearch at Cmabrigde Uinervtisy, it dseno’t mtaetr in waht oerdr the ltteres in a wrod are, the olny iproamtnt tihng is taht the frsit and lsat ltteer be in the rghit pclae. The rset can be a taotl mses and you can sitll raed it whotuit a pboerlm. Tihs is bcuseae the huamn mnid deos not raed ervey lteter by istlef, but the wrod as a wlohe. Azanmig huh? Yaeh, and I awlyas tghuhot slpeling was ipmorantt!
जर तुम्हाला वरील उतारा वाचता आला नाही तर हे उत्तर आहे...
I couldn't believe that I could understand what I was reading. The phenomenal power of human mind! According to research at Cambridge University, it doesn't matter in what order the letters in a word are, the only important thing is the first and the last letter be in the right place. The rest can be total mess and you can still read it without problem! This is because the human mind does not read every letter by itself, but the word as a whole! Amazing huh? Yeah, and I always thought spelling was important!
शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३
खमंग आनंद देणारी नगरी!
वेगवेगळ्या उपक्रमातून आणि कृतीतून शिक्षण दिले जाते आणि विद्यार्थ्यांना ते अधिक आवडते, आनंद नगरी हा आनंद देणारा आणि शिक्षण देणारा उपक्रम!
शुक्रवारी 29 डिसेंबर रोजी कासारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद नगरीचा आनंद घेतला आणि पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले; विविध खमंग पदार्थ खाऊन प्रोत्साहन दिले.
बऱ्याच पालकांनी पदार्थांच्या बाबतीत मुद्दामून हिशोबाची तपासणी केली, पदार्थ कमी जास्त घेतले तर किमतीत काय फरक पडतो अशी ही चौकशी केली.
याच आनंद नगरीमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षण होते गाढवाला शेपूट लावा आणि बक्षीस जिंका या खेळाचे!
शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी या आनंदनगरीच्या दुकानांचे नियोजन केले होते.
दही धपाटे, पोहे, गाजराचा हलवा, पाणीपुरी, पुरी भाजी, पाव भाजी, पेढे, बालूशाही, चहा, कचोरी, समोसा, वडापाव, मुरकुल, किराणा दुकान, फिल्टरचे पाणी, खिचडी, अप्पे, चिवडा अशा पदार्थांची रेलचेल या आनंद नगरीत होती.