इतुके सारे एका चॅनेलने केले !
( शेवट असा आहे....
म्हणून महाराष्ट्रातील
जे अनेक शिक्षक YouTube
चॅनेल तयार करून
या मार्गावर जात आहेत,
त्या सर्वांना
आपल्या मदतीची गरज आहे.
त्यांचे चॅनेल
सबस्क्राईब करा, व्हिडीओ
पहा. त्यांचा
आदर करा. )
मी
जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक
आहे. सरकारी शाळांमधील
विद्यार्थी असे असतात ज्यांचे
पालक आर्थिक दुर्बल किंवा
मध्यम परिस्थितीत असतात.
बहुतके जिल्हा परिषद
शाळेत शेत मजूर, वीटभट्टी
मजूर, छोटे दुकानदार,
खासगी कर्मचारी आणि
सामान्य शेतकरी पालक यांची
मुले शिकत असतात.
आमच्या
बदल्या एका शाळेतून दुसऱ्या
शाळेत होतात पण थोड्याशा
फरकाने ही परिस्थिती जवळपास
सारखीच असते, वर
नमूद केलेल्या प्रवर्गातील
विद्यार्थी हिच आमची मुले !.
या मुलांना शाळेत
आणणे, त्यांना
शाळेच्या वातावरणात टिकवणे,
त्यांना आनंदाने शिकत
रहाण्यासाठी फक्त पुस्तकी
अध्यापनाशिवाय आणखी काही
अधिक प्रयत्नांची आवश्यकता
असते.
जग
बदलत आहे; मुलांच्या
आनंदाची कारणे दिवसेंदिवस
बदलत आहेत. मुलांना
शाळेत ठेवण्यासाठी आता फक्त
मैदानी खेळ पुरेसे नाहीत.
आपल्याला काहीतरी
नवीन करावे लागेल, जे
काहीतरी त्यांना अधिक मनोरंजक
असू शकेल, काहीतरी
अधिक प्रभावी!
मुलांच्या
हातात मोबाइल असतात आणि
इंटरनेटसह असेल तर हे आश्चर्यकारक
डिव्हाइस म्हणजे संपूर्ण जग
त्यांच्या हातात आहे असे
त्यांना वाटते! हे
लक्षात घेऊन आम्ही शालेय
अभ्यासाक्रमामध्ये मोबाइलवरील
उपलब्ध स्त्रोतांना जोडण्याचा
निर्णय घेतला. मुद्दामहून
शाळेत येण्यासाठी पालकाकडे
वेळ नसायचा कारण त्यांचे काम
बुडले तर आर्थिक नुकसान होण्याची
भीती असायची, आम्ही
शाळेत जे काही करतो ते पालकांपर्यंत
सहज पोहोचण्याचे हे एक साधन
देखील बनले YouTube ! अभ्यासालापूरक
आणि मुलांना आवडेल असे काहीतरी
शाळेत सतत सुरु आहे हे पालकांना
सहज कळू लागले... यामुळे
विद्यार्थ्यांची संख्या,
शिक्षणाची गुणवत्ता
आणि शाळेबद्दलचा त्यांचा आदर
वाढला.
यूट्यूबकडून
प्राप्त झालेल्या 1 लाख
50 हजार रुपयांनी
या शाळेतील विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक साहित्यासाठी आणि
दर्जेदार शिक्षण देण्यास
लागणाऱ्या छोट्या खर्चांना
भागवण्यास योगदान दिले.
वडगाव दादहारी ता.
परळी वैजनाथ जिल्हा
बीड येथील जिल्हा परिषद प्राथमिक
शाळेतील २५० विद्यार्थ्यांना
एक लाख रुपयांचे शैक्षणिक
साहित्य वाटप करण्यात आले.
शाळेच्या पहिल्या
दिवशी बॅगसह नामांकित कंपनीच्या
वह्या, कंपास,
चित्रकला वही, कलर
बॉक्स, पेन असे
जवळपास प्रत्येकी ४०० रुपयांचे
शैक्षणिक साहित्य जून 2019
मध्ये देण्यात आले.
ज्या पालकांना यासाठी
खास आर्थिक तरतूद करावी लागते
त्यांना आणि कळत्या मुलांना
याचे महत्व कळाल्याने आनंद
चेहऱ्यावर दिसत होता!
याशिवाय
आणखी काय बरे झाले या पैशाने
?
१)
वर्गात कविता सादर
करण्यासाठी लहान मोबाइल कनेक्ट
स्पीकर्स उपलब्ध करुन देण्यात
आले. ज्यामुळे वर्गात
संगीतमय कविता, पाठ
सादर होऊ लागले.
२)
काही क्रीडा उपकरणे
पुरविली गेली ज्यामुळे खेळाच्या
मैदानावर मुलांचे खेळ अधिक
मनोरंजक बनले.
३)
या पैशातून आभासी
वास्तविकता जग दर्शविणारे
एक लहान डिव्हाइस सादर केले
गेले.(VR बॉक्स)
जगभरातील भौगोलिक
महत्त्व असलेली ठिकाणे,
जिथे आपण सामान्य
कुटुंबातील व्यक्ती कधीही
भेट देऊ शकत नाहीत अशी ठिकाणे,
शरीरातील आंतरक्रिया
जणू आपल्यासमोर घडताहेत अशी
आभासी वास्तविकता व्हीआर
बॉक्सच्या सहाय्याने त्यांच्या
समोर होती. यामुळे
मुलांना ते ठिकाणे सविस्तर
दिसण्यात आणि महत्त्वपूर्ण
तपशील समजण्यास मदत झाली.
VR Box त्यांना संबंधित
विषयांच्या संकल्पना स्पष्ट
करण्यात मदत करतात.
३)
गूगल अर्थ, सफारी
सेंटर, सौर यंत्रणेची
व्याप्ती, (Merge Box) विलीनीकरण
घनसाठी गॅलेक्टिक एक्सप्लोरर
यासारख्या विशिष्ट अॅप्सने
त्यांच्या हातात भौगोलिक जग
पाहण्यास मदत केली. यातील
काही अँप्ससाठी Merge Box तयार
करावे लागतात ते या खर्चातून
केले.
४) या
निधीतून दर पंधरवड्याला शालेय
मंत्रिमंडळामार्फत छोट्या
स्पर्धा आयोजित केल्या गेल्या
यासाठी पेपर तयार करून प्रिंट
केला जाऊ लागला. दोन
गटात प्रत्येकी ६ विद्यार्थ्यांना
बक्षिसे व प्रमाणपत्रे दिली
जाऊ लागली. बाहेरच्या
मैदानावर, पारदर्शक
वातावरणात होणाऱ्या या
परीक्षेतील मुलांचा प्रतिसाद
नोंदवला गेला आणि सर्वाधिक
परीक्षेत यश मिळवणाऱ्या
पहिल्या तीन विद्यार्थ्यांना
(दोन्ही गट) "
शाळारत्न "
पुरस्काराने गौरविण्यात
येऊ लागले. वर्षभरातील
सर्व खर्च YouTube चॅनल
मार्फत केला गेला.
५)
शिष्यवृत्तीची परीक्षा
देणाऱ्या मुलांना लागणारी
पुस्तके, प्रश्नसंच,
झेरॉक्स यांचा खर्च
यातून केला गेला.
६)
बोधकथा व पाठ यावर
आधारित नाटक स्पर्धा डिसेंबर
ते जानेवारी दरम्यान घेऊन
विजेत्या वर्गातील सर्व
मुलांना बक्षीस दिले जाऊ
लागले. दोन गट करून
स्पर्धा घेण्यात आल्या.
वडगाव व कासारवाडी
या दोन्ही शाळेत या स्पर्धा
झाल्या.
७) भाषा संवर्धन, गणित, विज्ञान, Spoken English Club, शालेय मंत्रिमंडळ अशा वेगवेगळ्या मंडळांची स्थापना करून विविध उपक्रम घेतले जातात आणि त्यासाठी सर्व खर्च (त्यांचे आय कार्ड्स, वेगवेगळ्या उपक्रमाचे साहित्य) केला जातो.
८) दैनिक
मराठवाडा साठी यांच्या वतीने
तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या
शालेय विद्यार्थ्यांच्या
बाल -धमाल स्पर्धेसाठी
तालुक्यातील सर्व जिल्हा
परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी
पारितोषिक म्हणून अकरा हजार
रुपये देण्यात आले.
९)
११ हजार रुपयांची छोटी
मदत महाराष्ट्र विद्यालय
मोहा येथे पाठवली गेली,
जेथे शेतमजूरांची
मुले शिकतात.
मुलांच्या
गरजा लक्षात घेऊन, जिथे
प्रशासकीय अडचण येते तिथे हा
खर्च केला जाऊ लागला. परिणामी
मुलांची उपस्थिती, संख्या
आणि गुणवत्ता यांचे प्रमाण
वाढले, शाळेत मुले
आनंदाने शिकत आहेत... त्यांच्या
चेहऱ्यावरचा आनंद किती अमूल्य
असतो नाही का ?
१०) PDSE (Place for Developing Spoken English या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिकत असलेल्या सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी झूम ऍप्लिकेशच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवणी सुरु आहे. त्यासाठी झूमचे पेड व्हर्जन मी घेतो, हा खर्च YouTube च्या माध्यमातून केला जात आहे. महाराष्ट्रातील १४०० पेक्षा जास्त विदयार्थी यात सहभागी झाले आहेत.
आठवड्यात तीन वेळा आम्हा चार शिक्षकांचा क्लास, एकदा परीक्षा आणि त्याशिवाय Talk With Guest, Gust Lecture, Chat with other country students, Breakout Room Interviews, Group Leaders chat, Parents Initiatives असे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचा आत्मविश्वास प्राप्त करून दिला जात आहे.
हे
कसे घडले ?
2004 पासून तंत्रज्ञानाच्या
विविध स्त्रोतांचा वापर
करण्यास सुरवात केली जेव्हा
या अफाट जगाने अध्यापन-अध्ययन
शिक्षण प्रक्रिया सुलभ आणि
सुखी करण्यास मदत केली.
परळी येथील कन्या
स्कूल येथे विद्यावाहिनी
प्रकल्प प्रयोगशाळा प्रभारी
म्हणून काम केले त्यावेळी
तिथे 15 संगणकांसह
लॅब होती जिथे माझा तंत्रज्ञानाद्वारे
प्रवास सुरू झाला. जिल्हा
परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी
येथे 5 संगणकांद्वारे
विद्यार्थ्यांना शिकविले
यावेळी गुगल सर्च इंजिन द्वारे
पाठाला अनुसरून चित्रे,
व्हिडीओ यांचा वापर
केला. मायक्रोसॉफ्ट
ऑफिसच्या वर्ड, एक्सेल,
पॉवरपॉईंट या प्रोग्रामचा
अधिक वापर केला. एक्सेल
द्वारे परीक्षा रजिस्टर तयार
केले ज्यामुळे माझा वेळ वाचला
आणि अध्यापनासाठी तो वापरता
आला. २०११ मध्ये
माझ्या स्वत: च्या
यूट्यूब चॅनेलवर शाळेतील
काही व्हिडीओ अपलोड केले.
वडगाव
दादाहारी येथे २०१४ मध्ये
बदली झाल्यानंतर मी शालेय
उपक्रम, कार्यक्रम,
नाटक, स्पर्धा
घेणे यात वाढ केली आणि हे सर्व
मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले.
मुले वर्गात आनंदाने
शिकत असताना, त्यांच्या
विविध कृती चालू असताना,
त्यांच्या स्पर्धा
चालू असताना व्हिडिओ रेकॉर्डिंग
करण्यात आल्या, Kinemaster आणि
इतर App द्वारे मी हे
संपादित केले आणि यूट्यूबवर
अपलोड केले. स्वतःला
व्हिडिओमध्ये पाहायला कोणाला
आवडत नाही ? घरी हे
व्हिडीओ पाहून पालकांना आनंद
वाटू लागला. आपल्या
मित्रांकडे, पाहुण्यांकडे
पालक हा व्हिडीओ शेअर करू
लागली.
ऑडिओ,
व्हिडिओ रेकॉर्डिंगचा
उपयोग मुलांचे मूल्यांकन
करण्यासाठीही प्रकर्षाने
केला, उदाहरणार्थ
त्यांचे इंग्रजी वाचन! मुले
त्यांच्या स्वत: च्या
चुका सुधारू लागली. पालक
आणि पाहुण्यांकडून होत असलेल्या
कौतुकामुळे मुले शाळेत
जाण्यासाठी पूर्वीपेक्षा
अधिक उत्सुक होते.
मी
राज्यातील, जिल्ह्यातील
शिक्षकांना विविध प्रशिक्षणात
तंत्रज्ञानाविषयी मदत केली.
त्यामुळे त्यांनी
माझे व्हिडीओ पाहिले, शेअर
केले.
जेव्हा
जेव्हा बर्याच लोकांच्या
संपर्कात येत असे तेव्हा मी
युट्यूबचा उल्लेख करत असे.
एक व्हिडीओ एक कोटी
लोकांनी पाहिला आणि बरेच
व्हिडिओ त्याच मार्गावर
आहेत.
तंत्रज्ञान
वापरताना, मुलांना
आनंदाने शिकवताना आपसूक हे
कार्य माझ्या हातून होत
आहे...पुढे चालूच
राहणार आहे.. म्हणून
महाराष्ट्रातील जे अनेक शिक्षक
YouTube चॅनेल तयार करून
या मार्गावर जात आहेत, त्या
सर्वांना आपल्या मदतीची गरज
आहे. त्यांचे चॅनेल
सबस्क्राईब करा, व्हिडीओ
पहा. त्यांचा आदर
करा.
चंद्रशेखर
शिवलिंगअप्पा फुटके
परळी
वैजनाथ जिल्हा बीड
9325063512
काही YouTube लिंक्स
https://youtu.be/JTADGGFJ_0g राजा आणि उंदीर : छोट्यांची धमाल नाटिका
https://youtu.be/P7MgT0y8IOw मोठ्या वर्गाची एक नाटिका
https://youtu.be/Wu0CLPpD2ao एक लाखाचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम
https://youtu.be/94Meyh8YQqs पहिल्या सात हजाराचा चेक
https://youtu.be/Sea2p0rCz-o एक कोटी लोकांनी पाहिलेली हिच नाटिका
https://youtu.be/x8qddeGowAI वर्गात होणारी ऍक्टिव्हिटी
https://youtu.be/-zYZ0v924hE शालेय मंत्रिमंडळ
https://youtu.be/mrWlrlYuJiw VR Box वापर
https://youtu.be/OMfzOP3Mc5U वर्गातील मजेदार खेळ
काही क्षणचित्रे
एक लाखाचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम June 2019
![]() |
Knoweldge Bridge या संस्थेने केलेला सन्मान मा भापकर साहेब विभागीय आयुक्त यांच्या हस्ते |
![]() |
शालेय मंत्रिमंडळ व त्यांचे उपक्रम |
खूप छान सर, खूप कौतुक आपले
उत्तर द्याहटवाThank you very much
हटवा