1996 चा काळ म्हणजे वर्तमानपत्रे समाजात अधिक वाचली जाणारा काळ. आजही त्यांचे वेगळे महत्व आहेच पण ईलेक्ट्रॉनिक मीडिया, टीव्ही यांनी दैनिकांच्या वाचक वर्गात मोठी घट केली आहे.
मी तीन वर्षा पुर्वी डी.एड शिक्षक झालो होतो पण वर्तमानपत्र आणि पुस्तके यातील लेखक, कवी यांच्या विषयी वाचनामुळे खूप मोठेपणा-वलय वाटत होते. आपण त्यांच्यासारखे व्हावे असे वाटायचे, खूप लोकांनी आपल्याला ओळखावे असे नेहमी वाटायचे.
बालपणापासून मला वाचनाची खूप आवड. हाती पडेल ते पुस्तक वाचत गेलो. मराठीतील कथा कविता खूप आवडायच्या.
पिंपळगाव गाढे हे माझे मूळ गाव. उन्हाळी सुटट्यात दरवर्षी तेथे जायचो. माझे चुलते शिक्षक आणि गावातील सार्वजनिक वाचनालयाचे संचालक श्री महालिंगअप्पा फुटके यांच्यामुळे वाचनालयातील पुस्तके वाचायला मिळायची. सकाळी वाचनालय़ उघडले की 5 पुस्तके घेऊन जायचो, गच्चीवर-पायर्यावर बसून पुस्तकांच्या दुनियेत हरवून जायचो. जेवण करण्यासाठी, कामासाठी मारलेल्या हाका मला कधीच कळत नव्हत्या.
संध्याकाळी पुन्हा वाचनालयात हजर ! सकाळी घेतलेली पुस्तके वापस करून नवी 5 पुस्तके घ्यायचो! (जास्त देत नव्हते म्हणून) रात्री पुन्हा त्याच पुस्तकांच्या दुनियेत!
हनुमानाच्या शेपटीला धरून रावणाची भव्य लंका पाहिली, शूर सिन्दबादच्या जहाजात बसून अनेक देश फिरलो, इसापच्या दुनियेत, पंचतंत्रात प्राण्यांकडून अनेक चांगल्या गोष्टी शिकल्या, राजा भोज सोबत सिंहासनाची एकेक पायरी चढत नव्या नव्या कथा शिकलो, विक्रमादित्य आणि वेताळ कहाणी भीत भीत वाचायचो पण झोपेत दचकून कधी उठायचो नाही (आजकाल टीव्ही वर मालिका पाहून मुले उठतात तशी! त्याचे कारण पुढे सांगतो) अलिफ लैला, अकबर बिरबल,जातक कथा, तेनली राम यातील पात्रे म्हणजे माझ्या आयुष्यातील हीरो आहेत. कॉमिक्स मध्ये नव्याने फॅटम आणि नवी पात्रे आली होती- या गोष्टी सुद्धा खूप खूप आवडीने वाचायचो. मुलांसाठी असणारी चांदोबा, चंपक, सोवियत रशिया येथून येणारे हिंदीतील मासिक या सर्वांचा माझ्यावर छान परिणाम होत होता...त्या काळी असणारे सर्व दैनिके आणि मासिके माझे मामा श्री उदगिरकर बंधू यांच्याकडे वाचायला मिळायचे.
गोष्टीच्या पुस्तकांनी माझे जीवन समृद्ध केले आहे असे मला वाटते. सगळ्या चांगल्या सवयी- कोणाशी कसे, काय बोलावे- मित्राशी कसे वागावे- काय खावे असे सारे सारे मला पुस्तकांनी दिले. कधी एकटा पडू दिले नाही, खूप वेळा तर मी मनाशी संवाद करायचे- हवेत बोटे फिरवून काही चित्रे काढायचो- अक्षरे गिरवायचो ( एक दोनदा तर यासाठी मार पण खाल्ला घरच्यांकडून!)
झाडाखाली शेतात एकटा बसायला घाबरत नव्हतो-घरी रात्री एकटा झोपायला घाबरत नव्हतो, त्याचे कारण पुस्तके ! वाचायची किंवा वाचलेली असतील तर त्यांच्या विचारात कल्पनेत छान झोप लागायची.
मला वाटते पुस्तके आपल्या कल्पना शक्तीमध्ये खूप मोठी वाढ करतात, आपल्या आयुष्यातील रितेपणा दूर करतात...ज्याचे बालपण अश्या कल्पनाशक्तीने भरलेले नसेल त्याचे आयुष्य रिते, कोरडे आणि रूक्ष जाऊ शकते! आपल्या जीवनातील अनेक समस्या कल्पनाशक्तीने दूर होऊ शकतात, कामात नावीन्य येते...माणूस प्रत्येक काम आनंदाने, उच्च ध्येयाने प्रेरित होऊन करू शकतो....नीतीमत्ता, माणुसकी, आपुलकी हे सगळे त्याला पुस्तकाने बहाल केलेले असते....सारासार विचार, आत्मशक्ति हे गुण त्याला मिळालेले असतात...म्हणूनच विक्रम वेताळ ची कहाणी वाचून सुद्धा तो घाबरत नाही कारण पुस्तकाने खरा देव आणि भूत कोणते हे ही त्याला सांगितलेले असते!
पुस्तके आणि रेडिओ कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी जेवढी मदत करतात तेवढी टीव्ही हानिकारक असते. टीव्हीत जो राजा दाखवलेला असेल तोच तुम्हाला दिसेल, जे राक्षस दाखवलेले असेल तेच तुमचे डोळे पाहतील....पण पुस्तक वाचत असताना तुम्ही राजा कसा असेल त्याची कल्पना करत असाल कदाचित एकच गोष्ट वाचणारा प्रत्येक मुलगा त्याच्या राजाचे वर्णन वेगळे करेल....हीच गोष्ट रेडिओ साठी पण जुळते...आम्ही रेडिओ खूप ऐकला....श्रवण चांगले केले...पुस्तकांनी आणि रेडिओ यांनी माझी एकाग्र शक्ति पण वाढवली...आज व्याख्यान ऐकत असताना, ट्रेनिंग मध्ये अनेक तास बसून मला एकाग्र बसून ऐकता येते...ही पुस्तकांची देण!
मुलांसाठी आपण काहीतरी लिहिले पाहिजे या प्रबळ इच्छेमुळे दैनिक वैद्यनाथ टाइम्सला श्री संजय खाकरे यांच्या सोबत 1995 मध्ये काम सुरू केले आणि येथेच प्रथम 'शेखर अंकल' चा जन्म झाला. मुलांना वडीलांपेक्षा काका जास्त आवडतात आणि ते त्याचा लाड पण करतात हे लक्षात घेऊन "शेखर अंकल" हे नाव मी स्वत: साठी घेतले.
दैनिक वैद्यनाथ टाइम्स आणि दैनिक मराठवाडा साठी हे त्या काळी परळीतील आपापसात स्पर्धा करणारे वर्तमानपत्रे! साथीने आपले रूपडे काळानुसार लवकर बदलले म्हणून ते पुढे आले आणि कालांतराने दैनिक वैद्यनाथ टाइम्स बंद झाले. साथीमध्ये आपल्याला चित्रासह गोष्टी देता येतील आणि अनेक चांगले उपक्रम राबवता येतील हे समजल्यानंतर श्री लक्ष्मण वाकडे यांच्या मदतीने संपादक श्री सतीश बियाणी यांना बोललो आणि 1996 पासून दैनिक मराठवाडा साथीचा 'अंकल' परळीसाठी कार्यरत झाला.
दिवंगत मुख्य संपादक श्री मोहनलाल जी बियाणी( काकाजी) यांच्याकडून नेहमी गप्पा मारता मारता अनेक अनुभव घेता आले. ( पुढे चालून रविवारचे सदर प्रसिद्ध झाले आणि मला काकाजी नेहमी 'अंकल' म्हणू लागले- एकदा तर काकाजींच्या वयाचे काही व्यक्ती त्यांना गप्पा मारत बसले होते, मी येताना दिसलो आणि काकाजी म्हणाले, या अंकल..मला पाठमोरे असलेले ते पाहुणे काकाजीचे कोणते अंकल आले म्हणून कुतूहुलाने पाहु लागले तर जेमतेम 22 वर्ष वयाचा मी!)
रविवारचे सदर सुरू झाले ते दैनिकाच्या एका कोपर्यात मात्र पुढे ते पानभर पसरले आणि तसेच आमचे चिमुकले वाचक सुद्धा मराठवाडा भर पसरले !
शाळा शाळा मधून मुले चित्र पाठवू लागली, गोष्टी लिहु लागली, कथा वाचू लागली, कोडे सोडवून पुस्तकरूपी बक्षीस मिळवू लागली....रविवारचा अंक लवकर संपू लागला तर कधी कधी दुपारी परत छपाई करण्याची गरज पडली...! दर सोमवारी साथी कार्यालयात मुलांच्या हस्तलिखितांचा पाऊस पडत होता...पोस्टमन 400-500 पत्रांचा गठ्ठा बांधून कार्यालयात घेऊन यायचा! आज स्वप्नवत ( माझ्यासाठी तरी) वाटत असलेले ते दिवस खरोखर मंथरलेले होते....अनेक वेळा माझी शाळा करून परळी येथील शाळा प्रार्थनेच्या वेळी गाठायचो आणि मुलांना भाग घेण्यासाठी आवाहन करायचो...सर्व शाळेत गेलो पण "शेखर अंकल" कोण आहेत हे कधी सांगितले नाही, माझा फोटो सुद्धा कधी छापला नाही...मलाच पत्रे देऊन मुले म्हणायची - हे शेखर अंकलला द्याल ना? मनात हसायचो आणि ठरवायचो असेच गुप्त राहू!
साथी दैनिकाच्या या अंकलने पुढची अनेक वर्षे सतत मुलांसाठी काम केले... विवाहाच्या आधी कुटूंबियांनी तर नंतर पत्नी सुजाताने मोठी मदत केली ......बर्याचदा रविवारी हे सदर नसले की मुले नाराज होत...मला त्यासाठी खूप वेळ द्यावा लागत होता...काम वाढत होते...पत्रे वाचणे, उत्तरे देणे, बक्षिसे देणे...कार्यक्रम आयोजित करणे...शाळा भेटी...पण हे सर्व आनंदाने करत होतो....
परळीतील सर्व मुलांना सोपे जावे म्हणून त्यांची उत्तरे, कथा, कविता स्विकारण्याची ठिकाणे वाढवली- शिवशक्ति मेडिकल गणेशपार, मुंदडा स्टेशनर्स मोंढा ....त्यांचे खूप सहकार्य लाभले....
“मुलांना लिहिते केले पाहिजे अंकल”....मला सतत मार्गदर्शन करणारे आबासाहेब वाघमारे सर मला म्हणाले, “ त्यासाठी त्यांची कार्यशाळा घे!” ठरले आणि पहिली बाल-लेखक कार्यशाळा मराठवाडा साथी कार्यालयात झाली...निवडक लिहिते विद्यार्थी यासाठी निमंत्रित केले गेले( हो, त्यांच्या नावचे पत्र शाळेला गेले- किती अभिमानाने ही मुले कार्यशाळेला आली आणि खूप काही शिकून गेली) दुसरी कार्यशाळा बाबा रामदेव मंदिरात झाली...
साथी दैनिकाने अंकलला आयुष्यात काही कमी पडू दिले नाही....अंकलने जे जे सांगितले ते ते केले, दिले....म्हणून ‘अंकल’ कायमचा साथी चा झाला...
पुढे पुढे मुलांनी खूप पुस्तके वाचावीत म्हणून प्रत्येक शाळेत साथी ने संदेश यात्रा काढली-वाचाल तर वाचाल! भरपूर प्रतिसाद मिळाला...प्रत्येक शाळेत नवा वक्ता मुलांना मार्गदर्शन करत होता...तालुक्यातील 50 पेक्षा जास्त शाळेत ही यात्रा पोंहचली...गोष्टीची पुस्तके मुले मागू लागली...
"कारगिल प्रबोधन यात्रा" हा सुद्धा साथी परिवाराने आयोजित केलेला कार्यक्रम सर्वांना आवडला...साथी कार्यालयात त्या काळी ज्ञानोबा सुरवसे, प्रदीप कुलकर्णी, प्रशांत जोशी (दोन्ही), सुधीर गोस्वामी, बालासाहेब कडबाने हे माझे सहकारी होते...डिटिपी ऑपरेटर म्हणून राम मुळाटे, मधुकर कुकर, संतोष जुजगर यांची पेज जुळवणी मुलांना आवडायची....
साथी दैनिकाने आजतागायत श्री चंदूलाल बियाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांसाठी छान छान कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि करत आहेत...दिवाळी अनुपम भेट स्पर्धा असतील...बाल धमाल असेल...मुलांना लिहिते करणे-त्यांच्या क्रियाशिलतेला वाव देणे आणि पर्यायी त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होणे, त्या आनंदाचे कारण बनणे हे सोडलेले नाही.... कालच्या परळी भूषण कार्यक्रमात माझ्याच साथी परिवाराने मला " विशेष गौरव" म्हणून सन्मान दिला म्हणून हा काळ भरभर नजरेसमोरून गेला.. .. आजपर्यंत हजारो मुलांनी साथी च्या कार्यक्रमांचा, दैनिकातून लिहिते होण्याचा लाभ घेतला आहे...आज ज्या मुलांनी बाल धमाल च्या स्पर्धा मध्ये भाग घेतला असेल त्यांच्या आई पप्पांनी सुद्धा लहानपणी ‘अंकल’ च्या सदरात भाग घेतलेला आहे...हे कार्य असेच पिढ्यांपिढ्या सुरू राहावे ही शुभेच्छा , त्यासाठी पूजा बियाणी, राजू बियाणी हे बियाणी परिवाराचे सदस्य आणि राकेश जाधव, दत्ता काळे हे नव्या पिढीतील पत्रकार तयार व्हावेत..
शेखर अंकल यांचे कार्य आम्हाला माहित आहे .आदर्श शिक्षक आहात आपण सर
उत्तर द्याहटवाThank you
हटवाशेखर uncle आणि पेपर....म्हणजे मेजवानी होती मुलासाठी...आणि हो त्याकाळात मोबाईल आणि बाकी मीडिया नसल्याने..... पेपर शी जवळीक होती..... खुप छान अंकल 👍
उत्तर द्याहटवाThank you Shitalkumar Dahiwal
हटवाThank you Sir ji 😊
उत्तर द्याहटवाशिक्षण खेळ कला संस्कृतिक व सामाजिक कार्यात आपण अग्रेसर आहात सर जी keep it up
उत्तर द्याहटवाThank you Sharma Sir
हटवाअंकल,
उत्तर द्याहटवाशाळेत साथी मधून तुम्ही भेटायचात मग साथीत भेट व्हायला लागली असा शिक्षक असा मार्गदर्शक व असा मित्र दुसरा होणे नाही .
शब्दात मांडाव असं तुमचं व्यक्तिमत्व नाही त्यासाठी मैफिल सजवावी लागेल
खूप खूप धन्यवाद आपल्या मनस्वी प्रतिक्रियेबद्दल
हटवाशेखर अंकल हेच पात्र अधिक भावत... आपण कायम अंकल म्हणूनच मार्गदर्शकाची भुमिका निभवावी सर...🙏👍
उत्तर द्याहटवानक्कीच... नेहमीच तयार 😊🙏
हटवाCongratulations sir...कठीण खडकाच्या खाली यशाच्या पाण्याचा निर्मळ झरा असतो...या उक्तीप्रमाणे आपले कार्य आहे
हटवाThank you Meekashi tai
हटवाखूप प्रेरणादायी कार्य आणि शब्दांकन सुद्धा ... अभिनंदन सर ..
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखूप प्रेरणादायी कार्य आणि शब्दांकन सुद्धा ... अभिनंदन सर ..
उत्तर द्याहटवाYour journey as Shekhar Uncle is so nice 👍🏻 Shekhar Uncle
उत्तर द्याहटवाThank you
हटवाखुप छान सरजी....पुन्हा नव्याने ओळख 👍👍🙏😊
उत्तर द्याहटवाThank you
हटवाSuperb. Sir ji. I mean shekhar uncle. Congratulations🎉🎉
उत्तर द्याहटवाThank you
हटवासर तुम्ही वाचण्याचे महत्व नेहमीच अधोरेखित केले आहे.तुमच्यामुळे मांडव्याच्या शाळेतील कपाटातील गोष्टीची पुस्तके मुलांच्या हातात आली. आमच्या लहानपणी आम्ही तेवढीच पुस्तकें वाचली पण त्यामुळे आम्ही अभ्यासक्रमाचेही पुस्तकेही वाचू लागलो. तूम्ही केलेली कृती छोटीशीच असेल पण पुढील जडणघडणीत खुप महत्त्वाची होती. म्हणुन आपल्या कार्याला सलाम करावा वाटतो.🙏🙏🙏
उत्तर द्याहटवाThank You Anant Sakhre
हटवाआपल्या या अखंड कार्यातून आपण अनेक मुले- मुली यांना वाचनाची व लेखनाची आवड निर्माण केली व आज तागायात करत आहात....आपल्या या अखंड सेवेला मानाचा मुजरा 🙏
उत्तर द्याहटवाThank you Sir ji
हटवामंतरलेले दिवस होते ते अंकल
उत्तर द्याहटवामलाही नव्हतं माहिती बराचकाळ अंकल कोणय ते, नंतर बाबांनी सांगितलेलं
मी स्वःतही तुला कविता का पत्र पाठवलेलं, आणि ते छापून आल्यावर मग चार पाच पेपर विकत घेतलेले त्यासाठी, हे अजूनही लक्षातय
अजून एक गंमतय,
मला वाटतय तेव्हा तू सेलिब्रिटीच होतास,
जरी कुणाला माहीत नव्हतं तरी शेखर अंकल हा सेलिब्रिटी होता, त्याचं एक वलय होतं, चाहते होते, आणि हे सगळं इंटरनेट क्रांतीच्या आधी होतं, मी आणि माझ्यासहित बरेच विद्यार्थी त्याचे साक्षीदार आहोत
लई जबरदस्त काळ होता तो
तू म्हणतोस तसाच तो शेखर अंकल ह्या नावाचा, ह्या जादूचा सुवर्णकाळ होता. (Whatsapp वरून साभार... मदन आबासाहेब वाघमारे)
सर तुमची स्टोरी एवढी छान होती हे माहीत नव्हत 😊 आणि तुमच्यामुळे आमची पण अशीच स्टोरी घडतेय 🙂 thanks sir... साक्षी विलास आढाव, वडगाव दादाहारी (Whatsapp वरून साभार...)
उत्तर द्याहटवाAshok Bhojne : Facebook Comment
उत्तर द्याहटवाफुटके सर तुमच्या आयुष्याचा हा रमणिय प्रवास असाच अखंड तेजोमय होत जावा..
तुमच्या सहवासचा गंध असाच चहुबाजूला उधळावा..
सुगंधी होऊन जावा प्रत्येकजन ज्यालाही या बहुरंगी अंकलचा सहवास लाभावा..
शेखर सर लिहीत रहा तुमचा शब्द न शब्द आम्हा सर्वांच्या मनात असाच रुंजी घालत रहावा..
हि सदिच्छा..
तुमचं प्राथमिक शिक्षक असणं हे एक आमच्या सर्वांना आभिमानास्पद बाब आहे..
Sarva mulanche avadate Sekhar Uncle.. Ma.Sa. chya Prashnamanjusha spardhet 1996 la mala milalele pramanpatra ajahi japun thevalay..satkaranimitta aaple khup khup Abhinandan...!! -Kalyan Kadbane (Student of Vivekanand Vidyalaya, Pimaplgaon Gadhe)
उत्तर द्याहटवाPooja Chandulal Biyani : Facebook comment -
उत्तर द्याहटवाCongratulations Shekhar Uncle !! Actually me too use to solve those puzzles n use to read tat page ! Uncle whts say, lets start tat Dhamal again !! 🙂 n again we r thankful of urs tat u considered us as a part of ur life !!
Shivhar Udgirkar : Facebook comment -
उत्तर द्याहटवा'शेखर अंकल' या अतुलनीय व्यक्तिमत्त्वाचा प्रवास मी जवळून पाहीला किंबहूना मी त्याचा साक्षीदार आहे असेही म्हणता येईल. दै.मराठवाडा साथी मध्ये येणारे शेखर अंकल यांचे बाल धमाल हे सदर म्हणजे बच्चे कंपनीसाठी मेजवानीच होती. या सदरात भाग घेण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. कुणी कथा ,कविता, विनोद तर कधी चित्र पाठवून या स्पर्धेत भाग घेण्यास बालगोपाळांची जणू चढाओढच लागायची आणि हे सगळ जमा करण्यास मूलांना पत्ता दिला होता...'शिवशक्ती मेडिकल स्टोअर', गणेशपार रोड...आमच्या दुकानातील फर्निचर मधील स्वतंत्र एक कप्पा मी मुलांसाठीच राखून ठेवला होता...मूल त्यांच लिखान असो अथवा स्पर्धा प्रवेशिका असो जमा करताना 'शेखर अंकल' ला नक्की द्या अस सांगायची, तेंव्हा त्यांच्या उत्साहाचे खूप अप्रूप वाटायचे. शेखर अंकल हा माझा परममित्र आहे याचा मला अभिमान आहे.
Dinesh Londhe: Facebook comment
उत्तर द्याहटवाखरंच सर आमच्या लहानपणी चे शेखर अंकल कोण होते ते आत्ता काही वर्षानी आम्हाला कळाले . ! तुम्ही शाळांमध्ये विविध स्पर्धा घ्यायचात, सुंदर अनुभव
Santosh Ghule: facebbok comment
उत्तर द्याहटवासर मी लहान असताना शेखर आंकल ची रविवारी वाट बघायची मराठवाडा साथी पेपरचि
Sham Aghav: facebbok comment
उत्तर द्याहटवाMazyasathi tar aapn aajhi shekhar Unkal ch ahet te mazya bolnyatun tumhala janwat asel. Tumhala je awadte te mhatwache
Bajirao Dharmadhikari : Facebbok comment
उत्तर द्याहटवाआमचे बालपण आनंदी करणारे शेखर अंकल!
Shitalkumar Dahiwal: Facebbok comment
उत्तर द्याहटवाशेखर uncle आणि पेपर....म्हणजे मेजवानी होती मुलासाठी...आणि हो त्याकाळात मोबाईल आणि बाकी मीडिया नसल्याने..... पेपर शी जवळीक होती..... खुप छान अंकल!
Jyoti Gulve: Facebook comment
उत्तर द्याहटवाशेखर अंकल आहेत कोन हे आम्ही सुद्धा शोधत होतो सर, तुमचे ते कार्य खरच खूप छान व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे होते ते सदर परत चालू करा व परत एक पिढी घडविण्याचे कार्य हाती घ्या
बंडू अघाव: Facebook comment
उत्तर द्याहटवाआपली पहिली ओळख शेखर अंकल म्हणूनच ती आज हि कायम आहे.
Rohini Pawar: Facebook comment
उत्तर द्याहटवाYour journey as Shekhar Uncle is so nice 👍🏻 Shekhar Uncle