गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

शासनाची राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा : अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2022

       

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या मधील कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत सन २०१५-१६ पासून कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये देशातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेश आपला सहभाग नोंदवितात. सन २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने कला उत्सवाच्या आयोजनामध्ये शास्त्रीय गायन, पारंपारिक गायन, तालवाद्य वादन, स्वरवाद्य वादन , शास्त्रीय नृत्य, पारंपरिक लोकनृत्य, द्वीमितीय चित्र, त्रिमितीय शिल्प व खेळणी तयार करणे व नाट्य ( भूमिका अभिनय) या १० कला प्रकारांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे सन २०२२- २३ मध्ये राज्याच्या १० कला प्रकारांचे १० संघ राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या Online कला उत्सवासाठी १० डिसेंबर २०२२ पर्यंत नामनिर्देशित करावयाचे आहेत. राज्याच्या संघ निवडीसाठी वर नमूद कला प्रकारांमध्ये ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

कला उत्सवामध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या,सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील ९ वी ते १२ वी मध्ये शिकणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. सर्व कला प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांचा वैयक्तिक (Solo) सहभाग असणार आहे. कला उत्सव स्पर्धेचे निकष सोबत जोडण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेबाबतच्या मार्गदर्शक सूचना http://www.kalautsav.in या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांसाठी सूचना:एक विद्यार्थी केवळ एका कला प्रकारातच सहभाग घेऊ शकतो.
सहभागी स्पर्धकांनी सोबत जोडलेल्या निकषांचे वाचन करावे.
कोणत्याही कला प्रकारच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केलेली असावी. व्यावसायिक कलाकारांचा सहभाग अथवा त्यांची मदत घेता येणार नाही,असे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेशिका रद्द केली जाईल.
निकषात नमूद केल्यानुसार ४ ते ६ मिनिटांचा व्हिडीओ मोबाईल अथवा कॅमेराद्वारे तयार करावा.
व्हिडिओमधील चित्र व आवाजात स्पष्टता असावी. तयार केलेला व्हिडीओ व चित्र, शिल्प, खेळणी तयार करणे या कलाकृतींचे सोबत ५ फोटो विद्यार्थ्यांने स्वतच्या/पालक/शिक्षकाच्या फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून #kalautsavmah२०२२ या हॅशटॅगचा वापर करून दि.३० ऑक्टोबर २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोस्ट करावा. व्हिडीओ पोस्ट करताना विद्यार्थ्यांने आपले नाव, इयत्ता, शाळेचा पत्ता, शाळेचा Udise क्रमांक, तालुका, जिल्हा, मेल आय. डी. संपर्क क्र. व भाग घेत असलेला कला प्रकार इ. उल्लेख करावा .
पोस्ट Public असावी, ई- मेल पत्ता स्वत:चा नसेल तर पालक /शिक्षक यांचा ई -मेल वापरावा.
फेसबुक, इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंट वरून व्हिडीओ पोस्ट करताना प्राप्त झालेली कोणतीही एक लिंक copy करून ठेवावी.
तदनंतर विद्यार्थ्यांने आपली नोंदणी https://scertmaha.ac.in/kalautsav/ या पोर्टल जाऊन करावी.
नोंदणी मधील सर्व माहिती विद्यार्थ्यांने बिनचूक व पूर्ण भरावी.
ही नोंदणी करताना फेसबुक,इंस्टाग्राम,ट्वीटर किंवा यु-टूब अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना यापैकी प्राप्त झालेली कोणतीही एकच link नमूद केलेल्या ठिकाणी Paste करावी.
एका स्पर्धेसाठी एका विद्यार्थ्यांची एकच पोस्ट असावी. तसेच एका विद्यार्थ्याला एका वेळी एकाच स्पर्धेत भाग घेता येईल. कला उत्सव स्पर्धेमध्ये राज्य स्तरापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्याला परत भाग घेता येणार नाही.
आपल्या सादरीकरणाची पूर्ण जबाबदारी स्पर्धकाची असेल.
एका वेळी एका पोस्टमध्ये एकाच विद्यार्थ्यांचे /पाल्याचे एकाच स्पर्धेचे साहित्य अपलोड करावे. एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे साहित्य अपलोड केल्यास/पोस्ट केल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
विद्यार्थ्यांच्या /पाल्याच्या व्हिडीओ सादरीकरणामध्ये कोणताही चुकीचा आशय/आक्षेपार्ह विधान केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
#kalautsavmah2022 हा हॅशटॅग लिहिताना अक्षरात कोठेही स्पेस देऊ नये, हॅशटॅगचे स्पेलिंग चुकवू नये.

राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा सन 2022-23

 Count down begins... कला उत्सव च्या नोंदणी साठी उरले आहेत... अवघे 4 दिवस..... त्यामुळे त्वरा करा... त्वरा करा... जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे सहकार्य घ्या....आणि स्पर्धेसाठी नोंदणी करा....!!! 


 अत्यंत महत्त्वाचे -

✍️  कला उत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यासाठी  अंतिम मुदत 30 ऑक्टोबर 2022 सायंकाळी  5 वाजेपर्यंत   आहे.
✍️ कृपया या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या आणि या स्पर्धेसाठी नोंदणी करा.
✍️ राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधून  यंदाच्या कला उत्सव स्पर्धेसाठी विदयार्थी यांचा प्रतिसाद वाढणे गरजेचे.
✍️ कला उत्सव म्हणजे - विद्यार्थ्यांच्या  कला गुणांना वाव देणारे मोठे व्यासपीठ.
✍️ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर परफॉर्म करण्याची संधी.
✍️विद्यार्थ्यांनी फेसबुक, इंस्ट्राग्राम अथवा युट्युब अकाउंटवर स्वतःचा कला सादर करतानाचा व्हिडीओ #kalautsavmah2022 या hashtag अंतर्गत पोस्ट करावा आणि त्याची लिंक एस सी ई आर टी ने दिलेल्या https://scertmaha.ac.in/kalautsav या पोर्टल वर आवश्यक माहिती भरून पोस्ट करावी.
✍️ सर्व माननीय डाएट प्राचार्य, डाएट अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांनी जास्तीत जास्त विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांना कला उत्सव स्पर्धेची मुदत वाढली असल्याचे अवगत  करावे आणि या कला उत्सव स्पर्धेसाठी विद्यार्थी यांची नोंदणी वाढवावी, असे आवाहन कला क्रीडा विभागाच्या विभाग प्रमुख मा. डॉ. नेहा बेलसरे यांनी केले आहे
✍️ लवकरच  कला उत्सवसाठी विद्यार्थी नोंदणीचे जिल्हानिहाय Status share केले जाईल.
✍️ कला उत्सव संदर्भात  संपूर्ण  पत्र वाचल्यानंतर अधिक माहितीसाठी अथवा काही अडचण असेल तर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स. 10 ते सायं. 6 या कार्यालयीन वेळेत  खालील अधिकारी यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा.

सहभाग नोंदवण्यासाठी वरील लिंकवर क्लिक करा 

श्री. सचिन चव्हाण,उपविभाग प्रमुख (संशोधन तथा कला व क्रीडा)
96230 27453

श्रीमती ज्योती राजपूत
अधिव्याख्याता 
88887 39807

श्रीमती पद्मजा लामरुड विषय सहायक
9822096107


(राजेश पाटील)
संचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे-३०
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची 'शेखर अंकलच्या' घरी सदिच्छा भेट!

 


      आपल्या वक्तृत्वाच्या आणि अंगी असलेल्या अभ्यासपूर्ण गुणांच्या आधारे राजस्थानची एक दिवशीय मुख्यमंत्री झालेली कुमारी मंजुश्री सुरेश घोणे हिने आपल्या माता पित्यासह माझ्या घरी आज सदिच्छा भेट दिली. 

        मंजुश्रीने यावेळी आपण राजस्थानची मुख्यमंत्री कशी झालो ते सविस्तर सांगून हा एकूणच प्रवास किती समृद्ध करणारा आणि आनंददायी होता हे सांगितले. तिने किती बारकाईने विचार करून आणि पुस्तकांचा, इंटरनेटचा अभ्यासात उपयोग करून या पदापर्यंत पोहंचता आले हे सांगितले. एकंदरीत तिचा हा प्रवास थक्क करणाराच होता. 

        मुळची सोनपेठ जवळील डिघोळ येथील रहिवाशी असलेली मंजुश्री भरपूर वाचन, लेखकांशी गप्पा, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि सातत्याने चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कामांची माहिती घेत आपले जीवन अधिक समृद्ध करत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. सुमारे तासभर तिच्याशी झालेल्या गप्पांनी मलाही बऱ्याचशा नव्या गोष्टी माहित झाल्या. 

        हिंगोली जिल्ह्यातील आकाश पोपळघट याच्याशी झालेली चर्चा याबाबत ती बोलली आणि तो आता जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या असणाऱ्या अमेरिकेतील एमआयटी (Massachusetts Institute of Technology)  येथे शिक्षण घेणार आहे.  जगातून फक्त 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश या विद्यापीठात निश्चित केला जातो. त्यामध्ये भारतातून आकाश हा एकमेव विद्यार्थी आहे. 

         मंजुश्री सध्या जम्मू काश्मीर मध्ये उच्च शिक्षण घेत असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शाळेच्या विविध ऍक्टिव्हिटी पाहते, विद्यार्थी हितासाठी तुम्ही खूप काही करता असे तिने व तिच्या आईवडिलांनी यावेळी आवर्जून सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने मला प्रोत्साहन देत असता म्हणूनच तुमची भेट घेण्याची इच्छा झाली असे म्हणत तिने शेखर अंकलचे आशीर्वाद घेतले.

खूप खूप मोठी हो मंजुश्री, समाजकल्याण करण्याचे तुझे भान पाहता प्रशासनात मोठ्या पदावर विराजमान होऊन तुझे कार्य शिखरास जावो हिच आमच्या परिवाराची या दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा!!  


 



google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

हा वारसा असाच अखंड सुरु राहू द्या बाळांनो!

अमृता सोमनाथ गुट्टे व तिच्या बहिणी दिवाळी सुट्टीत गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन करताना 


            "शेखर कुठे आहे ताई?" 
            "बसला असेल माडीवर... गोष्टीचे पुस्तक हातात घेऊन... पिंपळगावला आल्यानंतर तो कधी रिकामा बसतो?" 

           गोष्टीचे पुस्तक हाती आल्यानंतर मी त्यात एवढा मग्न व्हायचो की कितीही आवाज कानावर पडले तरी माझे प्रत्युत्तर नसायचे! आजही (कधीकधी) बायको आवाज देते आणि माझे प्रत्युत्तर मिळत नाही पण दुर्दैवाने हाती मोबाईल असतो! 😀 माझी बहीण, भाऊ, चुलते किंवा चुलत्या माझ्याविषयी माझ्या मूळ गावी गाढे पिंपळगावला आल्यानंतर चौकशी करायचे आणि त्याचे उत्तर तसे जवळपास सगळ्यांनाच माहीत असायचे... शांत, निवांत ठिकाणी जाऊन गोष्टीचे पुस्तक वाचण्याचा मला छंद लागलेला. 

               गाढे पिंपळगाव येथील सार्वजनिक वाचनालयातून सकाळी पाच पुस्तके घ्यायची, दिवसभर ती वाचून काढायची... संध्याकाळी वाचनालय परत उघडायचे त्यावेळी ती सकाळची पुस्तके परत करायची आणि नवीन पुस्तके घ्यायची! खरं म्हणजे एकाच व्यक्तीला एवढे पुस्तके देण्याचा त्यावेळी नियम नव्हता परंतु माझी वाचनाची आवड पाहून ग्रंथपाल श्री कावरे मला खुशी खुशीने ते पुस्तके द्यायची... शिक्षक असलेले माझे चुलते श्री महालिंगअप्पा फुटके हे या ग्रंथालयाचे संचालक आहेत, ज्यांनी वाचनाची आवड मुलांमध्ये निर्माण व्हावी म्हणून अगदी डालीमध्ये पुस्तके घेऊन घरोघरी वाटप केली होती... 






            

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     आज परत या आठवणी येण्याचे कारण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील माझी विद्यार्थिनी अमृता सोमनाथ गुट्टे हिने दिवाळी सुट्टी लागल्यानंतर पाचच दिवसात २१ पेक्षा अधिक गोष्टीची पुस्तके वाचली आहेत... नोंद केलेल्या कार्डचा फोटो आणि पुस्तकांचा व्हिडिओ तिने मला पाठवला त्यावेळी मला या आठवणी आल्या... गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालवण्याचा तिचा हा छंद असाच वृद्धिंगत होवो हीच शुभेच्छा... 


                   दिवाळीच्या सुट्टीत मुलांना गोष्टीचे पुस्तक वाचायला असावीत म्हणून इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन किंवा चार पुस्तके शालेय वाचनालयातली देण्यात आलेली आहेत... मोठी मुले नीट सांभाळ करतील आणि त्यांच्या छोट्या बहिण-भावांना देतील, शिवाय अशी ही सूचना देण्यात आलेली आहे की आपल्या स्वतः जवळील पुस्तके संपल्यानंतर मित्रांची पुस्तके आणायची, अदलाबदल करायची आणि पुस्तके वाचण्याची संख्या वाढवायची... वाचलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठीचे कार्डही देण्यात आलेली आहेत... 


           अमृताने सांगितले की स्वतः जवळची पुस्तके संपल्यानंतर गावातल्या सार्वजनिक वाचनातून जाऊन तिने पुस्तके आणली! गोष्टीचे पुस्तक हवे आहे म्हणून कदाचित या सार्वजनिक वाचनालयात पहिल्यांदाच एखाद्या शालेय विद्यार्थ्याचे पाऊल पडले असावे असं मला वाटतं! असंख्य विद्यार्थ्यांची पाऊले अशीच वाचनालयाकडे वळोत आणि वाचनालये गजबजून जावोत हिच दिवाळीनिमित्त शुभकामना!! 💥🌺🌹🌸
google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

म्हणींचा मजेदार खेळ!


तुम्ही खूप चांगल्या स्वभावाचे आहात आणि संकटात सापडलेल्यांना मदत करायला तुम्ही नेहमी तयार असता. हो ना? तुमच्या या स्वभावामुळेच तुमच्या भोवतालचे जग सुंदर आहे आणि ते नेहमी तसेच राहणार आहे. काही मिनिटांचा वेळ काढा आणि एक छोटेसे काम करा पाहू. 






म्हणींचा आणखी अभ्यास करण्याची इच्छा असेल तर खाली दिलेली सोपी परीक्षा द्या. उत्तरे चूक की बरोबर हे पण लगेच कळेल तुम्हाला! google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

इंग्रजी आणि मराठीतून शिका काळाचे प्रकार! पक्के लक्षात ठेवण्यासाठी काही आयडिया !

 

श्री चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके यांची मायक्रोसॉफ्ट इंनोवेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून निवड
विद्यार्थी असताना मुलांना सतावणारा व्याकरणाचा प्रकार म्हणजे विविध काळ! एकदा मन लावून समजून घेतले आणि विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा एकदा नजर टाकली (Revision) केले की हा भाग पक्का होत असतो... दिवाळी सुट्टीनिमित्त एकदा यावर नजर टाकून घ्या! सुट्टीच्या काळात दिवसभरात एक / दोन तास अभ्यासाला द्यायला काय हरकत आहे विद्यार्थी मित्रांनो? google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Similes काय असतात बरे? समजून घ्या आणि प्रश्नही सोडवा


Similes काय असतात बरे? समजून घ्या आणि प्रश्नही सोडवा 

a word or phrase that compares something to something else, using the words ‘like’ or ‘as’, for example ‘face like a mask’ or ‘as white as snow’; the use of such words and phrases.
एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीशी ‘like’ किंवा ‘as’ यांसारखे शब्द वापरून तुलना करणारा शब्द किंवा पदबंध, उदाहरणार्थ ‘face like a mask’ किंवा ‘as white as snow’ अशा शब्दांचा किंवा पदबंधांचा वापर; उपमा.

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

विज्ञान सेंटरला दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली!

विज्ञान हे प्रयोगातून अधिक स्पष्ट समजून घेता येते परंतु प्राथमिक शाळांमध्ये (विशेषतः जिल्हा परिषदांच्या) स्वतंत्र प्रयोग शाळा उभी करणे थोडी कठीण गोष्ट असते... बहुतेकदा अशा शाळांमध्ये जितके शक्य होईल तितकं आमच्या बंधू भगिनी प्रयत्न करत असतात विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रयोग-प्रात्यक्षिक करून दाखवण्याचा पण काहीवेळा त्यावर आर्थिक मर्यादा येत असतात... जवळपास एखादे विज्ञान सेंटर असेल तर त्यास भेट देणे हा त्यातील एक सोपा मार्ग आहे असे मला वाटते ... मराठवाड्यातील १ ले असे विज्ञान सेंटर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड जवळ केरवाडी येथे उभारण्यात आले आहे या याठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याचे ठरवले आणि अतिशय प्रभावी पद्धतीने मुलांनी याचा आनंद घेतला.   

                स्वतः करून पाहता येतील- हाताळता येतील असे मोठे प्रयोग, आकर्षक वाटतील असे त्यांना देण्यात आलेली रूपे, संकल्पना सहज स्पष्ट होतील अशा पद्धतीने त्यांची करण्यात आली रचना, निवेदकाची मुलांना खिळवून ठेवण्याची पद्धत यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम/गंगाखेड जवळील केरवाडी येथील डिस्कवरी सायन्स सेंटरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी दिलेली भेट विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंददायी ठरली! 

          जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट, तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग अधिक सहजपणे, सोप्या पद्धतीने समजावेत, त्यातील संकल्पना, सिद्धांत लक्षात यावेत यासाठी डिस्कवरी सायन्स सेंटरला भेट दिली. इयत्ता पाचवी ते आठवीच्या 45 विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विविध असे 100 च्या जवळपास प्रयोग करून पाहिले. 

       प्रत्येक घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न कसा करावा आणि आपल्या अवतीभवती असणाऱ्या, घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपल्या अनुकूल कसे करून घ्यावे किंवा आपण स्वतः त्याच्याशी कसे जुळवून घ्यावे, विज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात किती आणि कसा उपयोग करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना केंद्राचे समन्वयक श्री विरभद्र देशमुख यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्येक प्रयोग समजावून सांगताना करून दिले. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून व आपल्या खास शैलीतून सतत हसत खेळत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न विद्यार्थ्यांना खूप आवडला. 

          शाळेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड आणि शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते. 

https://youtu.be/U6LPyFIUKig