शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची 'शेखर अंकलच्या' घरी सदिच्छा भेट!

 


      आपल्या वक्तृत्वाच्या आणि अंगी असलेल्या अभ्यासपूर्ण गुणांच्या आधारे राजस्थानची एक दिवशीय मुख्यमंत्री झालेली कुमारी मंजुश्री सुरेश घोणे हिने आपल्या माता पित्यासह माझ्या घरी आज सदिच्छा भेट दिली. 

        मंजुश्रीने यावेळी आपण राजस्थानची मुख्यमंत्री कशी झालो ते सविस्तर सांगून हा एकूणच प्रवास किती समृद्ध करणारा आणि आनंददायी होता हे सांगितले. तिने किती बारकाईने विचार करून आणि पुस्तकांचा, इंटरनेटचा अभ्यासात उपयोग करून या पदापर्यंत पोहंचता आले हे सांगितले. एकंदरीत तिचा हा प्रवास थक्क करणाराच होता. 

        मुळची सोनपेठ जवळील डिघोळ येथील रहिवाशी असलेली मंजुश्री भरपूर वाचन, लेखकांशी गप्पा, ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि सातत्याने चांगल्या गोष्टी आणि चांगल्या कामांची माहिती घेत आपले जीवन अधिक समृद्ध करत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवले. सुमारे तासभर तिच्याशी झालेल्या गप्पांनी मलाही बऱ्याचशा नव्या गोष्टी माहित झाल्या. 

        हिंगोली जिल्ह्यातील आकाश पोपळघट याच्याशी झालेली चर्चा याबाबत ती बोलली आणि तो आता जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या असणाऱ्या अमेरिकेतील एमआयटी (Massachusetts Institute of Technology)  येथे शिक्षण घेणार आहे.  जगातून फक्त 40 विद्यार्थ्यांचा प्रवेश या विद्यापीठात निश्चित केला जातो. त्यामध्ये भारतातून आकाश हा एकमेव विद्यार्थी आहे. 

         मंजुश्री सध्या जम्मू काश्मीर मध्ये उच्च शिक्षण घेत असून भारताच्या संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या सेवेत जाण्याची तिची इच्छा आहे. फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या माझ्या शाळेच्या विविध ऍक्टिव्हिटी पाहते, विद्यार्थी हितासाठी तुम्ही खूप काही करता असे तिने व तिच्या आईवडिलांनी यावेळी आवर्जून सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही सातत्याने मला प्रोत्साहन देत असता म्हणूनच तुमची भेट घेण्याची इच्छा झाली असे म्हणत तिने शेखर अंकलचे आशीर्वाद घेतले.

खूप खूप मोठी हो मंजुश्री, समाजकल्याण करण्याचे तुझे भान पाहता प्रशासनात मोठ्या पदावर विराजमान होऊन तुझे कार्य शिखरास जावो हिच आमच्या परिवाराची या दिवाळीच्या निमित्ताने सदिच्छा!!  


 



google.com, pub-9286887712063098, DIRECT, f08c47fec0942fa0

२१ टिप्पण्या:

  1. गुरु शिष्य भक्ती चे मुर्तिमंत उदाहरण आज पाहावयास मिळाले....आपल्या सर्वांचे मंगल होवो...🙏नमन 🙏

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान सरजी.... आपल्या परिसस्पर्शाने असे अनेक विद्यार्थी घडले आहेत...👍👍💐💐🙏😊

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच छान मंजुश्री. शेखर अंकल आपल्याकडून प्रेरित झालेले विद्यार्थी अशीच गगनचुंबी झेप घेतात.👌🙏

    उत्तर द्याहटवा
  4. मंजुश्रीची यशोगाथा वाचायला आवडेल आम्हाला.🙏

    उत्तर द्याहटवा
  5. सोन्यासारख्या विचारांच्या दोन व्यक्तिंच्या भेटीचा एक सुवर्ण काळ
    Really Nice 👌

    उत्तर द्याहटवा