मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असा झाला मजेदार बालदिन! व्हिडिओ लिंक शेवटी अवश्य पहा



शिक्षकांची भूमिका आता आधुनिक काळानुसार बदलण्याची अपेक्षा शिक्षण क्षेत्राने केलेली आहे, काल दिनांक 14.11.2022 रोजी बाल दिनाच्या कार्यक्रमांमध्ये शालेय मंत्रिमंडळाने दोन दिवस अगोदर नियोजन करून जो कार्यक्रम सादर केला त्यातून आमच्याही असे लक्षात आले की आता खरोखरच आम्ही सुलभक अर्थात फॅसिलिटेटरच्या (Facilitator) भूमिकेत हळूहळू जात आहोत.
शालेय परिसरामध्ये आणि शाळेत जे साहित्य उपलब्ध आहे त्यातून विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षण घेणे अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण व्हावी  अशा प्रकारची वातावरण निर्मिती आणि आवश्यक साहित्याची निर्मिती मात्र शिक्षकांनी स्वतः केली पाहिजे. अनेक प्रशिक्षणामधून शिक्षकांना वारंवार सांगितले जाते.. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना केल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि हे विद्यार्थी सक्षमपणे या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत... आवश्यक त्या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज पडते, तिथे ते शिक्षकांचे मार्गदर्शन घेत आहेत. खेळांच्या तासाचे नियोजन, त्याच्या साहित्याचे नियोजन, परिपाठाचे नियोजन, वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धांचे नियोजन, वाचनालयाचे नियोजन शालेय विद्यार्थ्यांच्या बँकेचे नियोजन आणि अधून मधून होणाऱ्या अशा प्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन.... हे सर्वच शालेय मंत्रिमंडळाची विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत..
शालेय मंत्रिमंडळाने 10 नोव्हेंबर रोजी बाल दिनाची संपूर्ण तयारी केली. एका बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येक मंत्र्याला वेगवेगळी जबाबदारी दिली, खेळ, शिस्त, बक्षिसे खेळांची वेगवेगळी रचना, गोंधळ होणार नाही यासाठी सर्वांनी मिळून सर्वांना कशी मदत करायची हे सर्वजण बैठकीत चर्चा करत होते त्यावेळी माझी उपस्थिती होती... या वयात तुम्ही सर्व जबाबदाऱ्या अगदी सहजपणे पार पाडत आहात याचा आनंद आहे... मंत्र्यांनो असेच समृद्ध व्हा सक्षम व्हा आणि एक दिवस खरोखरच देशाचा कारभार सांभाळा हीच देशाची पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी प्रार्थना! 
- चंद्रशेखर फुटके
या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/UTSvr7PrMbM


1 टिप्पणी: