जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवून पात्र झाल्याबद्दल गावचे उपसरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या वतीने आयोजित नगर भोजन कार्यक्रमात आदरणीय ह भ प श्री वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज झोलकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन कुमारी आरती तुकाराम गुट्टे हिचा सन्मान करण्यात आला. गावात असणाऱ्या ग्रामदैवत श्री गोदमेश्वर मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपसरपंच श्री बंडू गुट्टे, मार्गदर्शक शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके व मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांची उपस्थिती होती. शेकडो ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आरतीचे कौतुक केले. अनेकांनी तिला 'फक्त शाळेतील शिकवणीवर' हे यश मिळवल्याबद्दल शाबासकी दिली. पंचक्रोशीतील अनेक पुरुष, महिला भाविक मोठ्या संख्येने किर्तन व नगर भोजन कार्यक्रमास उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा