महाराष्ट्रातील कलाकार मंडळी आणि कलाप्रेमी महिला बंधू-भगिनींसाठी आनंदाची बातमी!
दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धा
दैनिक मराठवाडा साथी मागील अनेक वर्षापासून बीड जिल्ह्यातील आपल्या वाचकांसाठी गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धेचा आयोजन करत आहे, यावर्षी प्रथमच या स्पर्धा राज्यस्तरीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत
गौरी गणेश सजावट स्पर्धेसाठी सार्वजनिक देखावा व घरगुती गणेश देखावा अशा दोन स्तरावर ही स्पर्धा होईल
नियम व अटी
1. राज्य स्तरावर महालक्ष्मी सजावट, गणेश मंडळ सार्वजनिक देखावा व गणेश घरगुती देखावा अशी स्वतंत्र प्रथम, द्वितीय व तृतीय अशी नगदी बक्षिसे तसेच स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन प्रत्यक्ष होणाऱ्या सोहळ्यात सन्मानित केले जाईल.
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी
प्रथम बक्षीस ११००१ रुपये
द्वितीय बक्षीस ७००१ रुपये
तृतीय बक्षीस ३००१ रुपये
महालक्ष्मी व घरगुती गणेश स्पर्धासाठी स्वतंत्र बक्षिसे
प्रथम बक्षीस ५००१ रुपये
द्वितीय बक्षीस ३००१ रुपये
तृतीय बक्षीस २००१ रुपये
2. आवश्यक अशी संख्या (किमान २५ सहभाग) असेल तर जिल्हा निहाय प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
2. सर्व सहभागींना डिजिटल पद्धतीने सहभाग प्रमाणपत्र मिळेल.
3. कुठलीही एडिटिंग न करता 16 एमबी व 3 मिनिटापेक्षा जास्त नसेल असा व्हिडिओ पाठवावा लागेल.
4. व्हिडिओ सुरू करताना सुरुवातीला स्पर्धकाने "दैनिक मराठवाडा साथी आयोजित स्पर्धेसाठी व्हिडीओ" असे आणि स्वतःचे नाव, तालुका, जिल्हा व मोबाईल नंबर दिसेल अशी माहिती सजावट स्पर्धेजवळ कागदावर लिहून व्हिडिओत दाखवावी लागेल.
5. एखाद्या सामाजिक विषयाबद्दल संपूर्ण थीम असणाऱ्या स्पर्धकांचा अधिक विचार करण्यात येईल.
6. व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर कुठल्याही पद्धतीने प्रक्षेपित (प्रसिध्द) न करता फक्त स्पर्धेकरिता पाठवावा लागेल.
7. आपले व्हिडिओ दिनांक 30 सप्टेंबर 2023 च्या आत श्री चंद्रशेखर फुटके सर यांच्या 93250 63512 या क्रमांकावर पाठवावेत.
8. सर्व स्पर्धकांना संयोजकांचे नियम अंतिम मानावे लागतील.
9. यासंदर्भात समस्या असल्यास कृपया पुढील क्रमांकावर व्हाट्सअपद्वारे संपर्क साधावा.
श्री चंद्रशेखर फुटके
93250 63512
श्री ओमप्रकाश बुरांडे
94220 94111
डॉ प्रभू गोरे, औरंगाबाद
90757 16739
वरील स्पर्धांचे प्रायोजक आहेत: बंसल क्लासेस महाराष्ट्र, राजस्थानी मल्टीस्टेट, क्युरियस किड्स
स्पर्धेचे मुख्य संयोजक
मा श्री चंदुलाल बियाणी
(मुख्य संपादक दैनिक मराठवाडा साथी)
दैनिक मराठवाडा साथी, राजस्थानी मल्टीस्टेट आणि राधा मोहन साथी प्रतिष्ठान यांच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धा
प्रश्नोत्तरातून शंका - समाधान
१) कोणत्याही जिल्ह्यातील असलो तरीही सहभाग घेता येईल का?
: होय, स्पर्धा राज्य स्तरावर आहे.
२) नोंदणी करण्याची गरज आहे का?
: नाही, तुम्ही व्हिडिओ पाठवत असताना तुमची माहिती पाठवली की तुम्ही स्पर्धेत आलात.
३) तीन स्पर्धा आणि वेगवेगळे बक्षीस आहेत का?
: होय. तीनही स्पर्धांची नगदी बक्षिसे, स्मृतिचिन्ह प्रथम द्वितीय तृतीय अशी वेगवेगळी बक्षीस असून याशिवाय प्रत्येक जिल्हास्तरावर स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आहेत.
४) तुम्ही प्रत्यक्ष पाहण्यास येणार आहेत का?
: नाही. स्पर्धा ऑनलाईन आहे.
५) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख काय आहे?
: ३० सप्टेंबर २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा