महाराष्ट्र टॅलेंट सर्च अर्थात MTS परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थ्यांचे यश
स्कॉलरशिप परीक्षेची तयारी म्हणून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील इयत्ता सातवीच्या सहा विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी आपली नाव नोंदणी केली होती. वर्षभरात या विद्यार्थिनींनी केलेल्या मेहनतीमुळे सर्वच्या सर्व मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
शनिवारी शाळेच्या वतीने या विद्यार्थिनींना आकर्षक प्रमाणपत्र, मेडल आणि भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. "तुम्ही केलेल्या मेहनतीचे निश्चितच कौतुक आहे आणि इतर सर्व वर्गातल्या विद्यार्थिनींसाठी तुम्ही मार्ग दाखवला आहे", असे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांनी त्यांना सन्मानित करताना म्हटले. मार्गदर्शिका श्रीमती प्रिया काळे मॅडम यांनीही विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. कुमारी वैष्णवी विठ्ठल गुट्टे, कोमल कृष्णा गुट्टे, चैतन्या सुनील गुट्टे, यशश्री तुळशीराम गुट्टे, अक्षरा संदीप गुट्टे आणि अक्षरा सचिन गुट्टे या विद्यार्थिनींचा यात समावेश आहे.
शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्री दत्तात्रय मुंडे, श्रीमती शुभांगी चट तसेच गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मिरवट केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मिश्रा मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक श्री घुगे साहेब, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री कनाके साहेब यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा