रविवार, १७ सप्टेंबर, २०२३
कासारवाडी येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा
मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील ध्वजारोहण शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्या हस्ते तसेच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी कासारवाडीच्या सरपंच सौ उर्मिला बंडू गुट्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.
त्यानंतर प्रभात फेरी काढण्यात आली. विठ्ठल-रखुमाई आणि महाराष्ट्राच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये असणाऱ्या मुली, मुले, लेझीम पथक यामुळे प्रभात फेरीला शोभा आली होती. भारत मातेसह मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या जय घोष करत विद्यार्थ्यांनी कासारवाडीला दणाणून सोडले.
प्रभात फेरी शाळेत परतल्यानंतर शाळेतील शिक्षिका श्रीमती प्रिया काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषेबद्दलची गौरव असणारी गीते उत्कृष्ट नृत्य करत सादर केली. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार संचालन श्रीमती प्रिया काळे यांनी केले.
गावचे ग्रामसेवक श्री नागरगोजे यांच्यासह गावचे पोलीस पाटील श्री बाबुराव गुट्टे आणि शाळेचे शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती दिली.
ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कासारवाडीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांच्या आभार प्रदर्शनानंतर हा कार्यक्रम संपला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्व श्री दत्ताराव मुंडे, सरोजकुमार तरुडे, राजेश्वर स्वामी व श्रीमती शुभांगी चट यांनी मेहनत घेतली.
गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३
My Father : An Essay. माझे वडील - निबंध. मेरे पिता। तीन भाषेतील एक निबंध
My Father
My name is …….. My father’s name is…….. His age is……. He is ……..
(Occupation). My father is my superhero.
He is tall and strong, and he always makes me feel safe. He has a big smile and
a kind heart. He works hard every day to take care of our family.
My father is also very smart. He knows a lot about many things,
and he teaches me new things every day. He helps me with my homework and tells
me stories about when he was a little boy.
My father is very funny too. He makes me laugh all the time with
his jokes and funny faces. He loves to
play games with me and take me to the park.
I love my father very much, and I know he loves me too. He
always tells me how proud he is of me and how much he loves me. I feel very
lucky to have such an amazing father.
माझे वडील
माझं नाव ..... आहे. माझ्या वडिलांचे
नाव .... आहे. त्यांच वय...... आहे. ते ..... व्यवसाय करतात. माझे वडील माझे सुपरहिरो आहेत. ते उंच
आणि सशक्त आहेत आणि ते मला
नेहमीच सुरक्षित ठेवतात. त्यांच्याकडे मोठं स्मित हास्य आणि दयाळू हृदय आहे.
आमच्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी ते रोज मेहनत घेतात.
माझे वडील खूप हुशार आहेत. त्यांना
बऱ्याच गोष्टींबद्दल बरेच काही माहित आहे आणि ते मला दररोज नवीन गोष्टी शिकवतात.
ते मला माझ्या गृहपाठात मदत करताट आणि ते लहान असतानाच्या गोष्टी मला सांगतात.
माझे वडील खूप आनंदी असतात. ते आपल्या
विनोदांनी आणि गमतीदार चेहऱ्याने मला नेहमी हसवतात. त्यांना माझ्याबरोबर खेळ
खेळायला आणि मला पार्कमध्ये घेऊन जायला आवडतं.
मी माझ्या वडिलांवर खूप प्रेम करतो
आणि मला माहित आहे की ते देखील माझ्यावर प्रेम करतात. त्यांना माझा किती अभिमान
आहे आणि ते माझ्यावर किती प्रेम करतात हे ते मला नेहमी सांगतात. मी स्वतःला खूप
भाग्यवान समजतो की मला असे खूप चांगले वडील मिळाले.
मेरे पिता।
मेरा नाम __________
है। मेरे पिता
का नाम ______ है। उनकी उम्र ____ है। वह
____ व्यवसाय करते है। मेरे पिता मेरे
सुपरहीरो हैं। वह लंबे और तबियत से अच्छे है और वह हमेशा मुझे सुरक्षित महसूस
कराते है। उनके पास एक बड़ी मुस्कान और एक दयालु दिल है। वह हमारे परिवार की
देखभाल करने के लिए हर दिन कड़ी मेहनत करते है।
मेरे पिता बहुत होशियार हैं। वह कई
चीजों के बारे में बहुत कुछ जानते है और वह मुझे हर दिन नई चीजें सिखाते है। वह
मेरे होमवर्क में मेरी मदद करते है और मुझे वे कहानियां सुनाते है जब वह एक छोटा
लड़का थे।
मेरे पिता बहुत
मजाकिया भी हैं। वह मुझे हर समय अपने चुटकुलों सुनाते और मजाकिया चेहरों के साथ
हंसाते है। उन्हें मेरे साथ खेल खेलना और मुझे पार्क में ले जाना पसंद है।
मैं अपने पिता
से बहुत प्यार करता हूं और मुझे पता है कि वह भी मुझसे प्यार करते हैं। वह हमेशा
मुझे बताते है कि उन्हें मुझ पर कितना गर्व है और वह मुझसे कितना प्यार करते है।
मैं बहुत भाग्यशाली महसूस करता हूं कि मुझे ऐसे अच्छे पिता मिले।
रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप : Reliance Foundation Scholarships
रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप
देशाची प्रगती सुनिश्चित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तरुणांमध्ये गुंतवणूक करणे या रिलायन्सचे संस्थापक-अध्यक्ष श्री धीरूभाई अंबानी यांच्या विश्वासाने प्रेरित होऊन रिलायन्स २५ वर्षांहून अधिक काळ गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहे. गेल्या काही वर्षांत रिलायन्स फाऊंडेशनच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमांनी भारतभरातील १३,००० तरुणांच्या जीवनावर परिणाम केला आहे.
१९९६ मध्ये धीरूभाई अंबानी शिष्यवृत्ती (डीएएस) स्थापन झाल्यापासून रिलायन्सने गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आणि पाठबळ दिले आहे आणि त्यांना तरुण व्यावसायिक बनण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. यातील अनेक अभ्यासक भारतातील आयआयटी, आयआयएमसह प्रमुख संस्थांमधून पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत.
'डीएएस'ने अभ्यासकांना आत्मविश्वास वाढविणे, शिक्षणाच्या वाढीव संधी उपलब्ध करून देणे आणि कमाईची क्षमता वाढविणे याद्वारे अभ्यासकांना प्रगतीसाठी एक पायरी उपलब्ध करून दिली आहे, तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक सुबत्तेसाठी योगदान देण्यास सक्षम केले आहे. डीएएसच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या समुदायात आणि कामाच्या ठिकाणी नेतृत्वाची पदे स्वीकारली आहेत आणि भारत आणि परदेशातील नामांकित संस्थांमध्ये नोकरी मिळवली आहे.
2020 मध्ये, रिलायन्स फाउंडेशनने 'रिलायन्स फाउंडेशन स्कॉलरशिप इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड कॉम्प्युटर सायन्सेस' सुरू केले जे भारताच्या भविष्याला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या फ्रंटियर सायन्स आणि अभियांत्रिकी क्षेत्रात सखोल प्रभाव पाडत आहेत.
2022 मध्ये, रिलायन्स फाऊंडेशनने पुन्हा एकदा भारतातील तरुणांना आपली वचनबद्धता दर्शविली आणि पुढील 10 वर्षांत अतिरिक्त 50,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची वचनबद्धता दर्शविली, ज्याचे उद्दीष्ट देशभरातील प्रतिभावान तरुणांना विकसित करणे आहे ज्यांना सामाजिक हितासाठी देशाच्या भविष्यातील यशास चालना देण्याची क्षमता आहे.
2022-2023 मध्ये रिलायन्स फाऊंडेशन रिलायन्स फाऊंडेशन अंडरग्रॅज्युएट स्कॉलरशिपच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकातील 5,000 गुणवंत पदवीधर विद्यार्थ्यांना आणि रिलायन्स फाऊंडेशन पदव्युत्तर शिष्यवृत्तीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानात पात्र विषयांचा अभ्यास करणाऱ्या भारतातील 100 हुशार पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मदत करणार आहे.
रिलायन्स फाऊंडेशन स्कॉलरशिप या दोन्ही शिष्यवृत्तींचे उद्दिष्ट गुणवंत विद्यार्थ्यांचे संगोपन आणि सक्षमीकरण करणे आहे आणि मजबूत, गतिमान आणि व्यस्त माजी विद्यार्थ्यांचे जाळे तयार करण्यासाठी एकत्र काम करेल, ज्यामुळे विद्वानांना उच्च शिक्षण घेण्यास, तरुण व्यावसायिक म्हणून उदयास येण्यास आणि भारताच्या विकासाला चालना मिळेल.
खाली दिलेल्या साईट वर क्लिक केल्यानंतर सांगितलेल्या प्रोसेस पूर्ण करा आणि 5000 विद्यार्थ्यांपैकी एक तुम्ही सुद्धा होऊ शकता.
Click Here to go on website!
या स्कॉलरशीपबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे पुढे दिलेल्या Whatsapp नंबरवर hi असा मेसेज पाठवा आणि अधिक माहिती मिळवा. 7977100100
पेपर क्राफ्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
पेपर क्राफ्ट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या पेपर क्राफ्ट स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
कला शिक्षक नसताना सर्व विषयांचे अध्यापन करणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षकांना कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयातही विद्यार्थ्यांना गोडी लावायची असते. थोडेसे नियोजन केले तर यात विद्यार्थी रस घेतात म्हणूनच कासारवाडी येथे पेपर क्राफ्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळावा म्हणून शालेय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्पर्धांचे अर्धवार्षिक नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयांचा तसेच व्यक्तिमत्व विकासाला प्रोत्साहन मिळेल अशा स्पर्धांचा विचार करून हे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याध्यापक श्री राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख म्हणून श्री फुटके तसेच सर्व वर्गांचे वर्गशिक्षक श्री तरुडे, श्री स्वामी, श्री मुंडे तसेच श्रीमती काळे, श्रीमती चट यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. शालेय मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री म्हणून चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे तर उपमुख्यमंत्री म्हणून कु राधा अनंत गुट्टे कामकाज पाहत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चि कन्हैया ज्ञानेश्वर गुट्टे याने केले.
नियमित अभ्यास आणि विविध स्पर्धा व त्यांची आकर्षक प्रमाणपत्रे व बक्षिसे मिळत असल्याबद्दल विद्यार्थी आनंद व्यक्त करत आहेत.
बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३
राज्यस्तरीय ऑनलाईन गणेश व महालक्ष्मी सजावट स्पर्धा : भरघोस बक्षिसे!