बुधवार, २७ मार्च, २०२४

Make Questions! प्रश्न बनवा!

 

मॅडम किंवा सरांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन कंटाळा आला? मग तुम्ही बनवा प्रश्न! सोपे आहे का? प्रश्नच नाही!


शिक्षक तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतात आणि तुम्ही उत्तरे देता; आज मी तुम्हाला उत्तर देणार आहे आणि तुम्ही अधोरेखित भाग उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा आहे. आहे ना मजेशीर? चला तर शिकू या नवे काही! 


Every time teacher asks you question and you give answer. This time I am giving you answers, and you have to make the question! Isn't it interesting? Let's start! Underlined part should come as answer to your question.   

'Wh' words are -What, where, who, which, how, how many, how much. 


रविवार, २४ मार्च, २०२४

MTS परीक्षेत जिप शाळा कासारवाडी विद्यार्थ्यांचे यश


महाराष्ट्र टॅलेंट सर्च अर्थात MTS परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थ्यांचे यश

स्कॉलरशिप परीक्षेची तयारी म्हणून घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी केंद्र मिरवट तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील इयत्ता सातवीच्या सहा विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले आहे.
नुकत्याच झालेल्या परीक्षेमध्ये इयत्ता सातवी वर्गात शिकत असलेल्या सहा विद्यार्थिनींनी आपली नाव नोंदणी केली होती. वर्षभरात या विद्यार्थिनींनी केलेल्या मेहनतीमुळे सर्वच्या सर्व मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. 

शनिवारी शाळेच्या वतीने या विद्यार्थिनींना आकर्षक प्रमाणपत्र, मेडल आणि भेटवस्तू देऊन शाळेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. 
"तुम्ही केलेल्या मेहनतीचे निश्चितच कौतुक आहे आणि इतर सर्व वर्गातल्या विद्यार्थिनींसाठी तुम्ही मार्ग दाखवला आहे", असे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांनी त्यांना सन्मानित करताना म्हटले.
 
मार्गदर्शिका श्रीमती प्रिया काळे मॅडम यांनीही विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. कुमारी वैष्णवी विठ्ठल गुट्टे, कोमल कृष्णा गुट्टे, चैतन्या सुनील गुट्टे, यशश्री तुळशीराम गुट्टे, अक्षरा संदीप गुट्टे आणि अक्षरा सचिन गुट्टे या विद्यार्थिनींचा यात समावेश आहे.



शाळेतील शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री सरोजकुमार तरुडे, श्री राजेश्वर स्वामी, श्री दत्तात्रय मुंडे, श्रीमती शुभांगी चट तसेच गावचे सरपंच श्री बंडू गुट्टे, शालेय समितीचे अध्यक्ष श्री सखाराम गुट्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, मिरवट केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती मिश्रा मॅडम, केंद्रीय मुख्याध्यापक श्री घुगे साहेब, परळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री कनाके साहेब यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे. 







मंगळवार, १९ मार्च, २०२४

काय काय शिकले मुले? पेपर क्राफ्ट: किल्ला बनवणे स्पर्धा

 


















इतिहासातील संकल्पना स्पष्टरित्या समजण्यासाठी, किल्ल्याची संरचना कळण्यासाठी आणि बुद्धी व हातांची सुंदरता प्रत्यक्षात साकारण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी या ठिकाणी पेपर क्राफ्ट अंतर्गत किल्ले बनवण्याची स्पर्धा संपन्न झाली होती; त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.


इयत्ता पहिली ते आठवी या वर्गातील कोणतेही पाच विद्यार्थी गटामध्ये या स्पर्धेत सहभागी होऊ शकत होते. समविचारी मित्र-मैत्रिणी एकत्र आले आणि सुंदर किल्ल्यांची निर्मिती झाली होती. 


हे किल्ले बनवल्यानंतर शिक्षकांसमोर त्याचे सादरीकरण करावयाचे होते. 
हे असेच का बनवले? हे अमुकरीत्या बनवण्याचा उद्देश काय? शत्रू आले तर सैनिक कुठून येणार? हे नेमके कशाचे तयार केलेस? अशा प्रश्नांची छान उत्तरे गटामधून मिळत होती आणि मुले किल्ल्यांचे महत्त्वही समजून घेत होती. इतिहास शिकवण्याचा हा सुंदर मार्ग नव्हे का?


"माझ्या जवळचा काळा रंग संपला तेव्हा मी कोळसा कुटून तो रंग तयार केला; आणि जेव्हा पांढरा रंग संपला तेव्हा घरात असलेल्या चुन्याचा वापर केला" जेव्हा पाचवी मधील पूनम हे सांगत होती तेव्हा लक्षात आले की मुलांना जेव्हा आयुष्यात अडचणी येतील तेव्हा नक्कीच त्यावर मार्ग शोधण्याचे संस्कार अशा छोट्या स्पर्धा मधून होतात. 
सध्या हे छोटे कप सुद्धा त्यांना आनंद देत आहेत भविष्यात त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळो आणि कितीतरी सुंदर कप मिळत राहोत अशा शुभेच्छा! 




Write Correct Articles! लिहा योग्य उपपदे!

 

A, an the हे तीन articles नेहमी Nouns च्या अगोदर काही नियमानुसार वापरले जातात. 


1) उच्चारानुसार consonants अर्थात व्यंजन अक्षराने सुरू होणाऱ्या noun च्या अगोदर a article वापरतात. a cat, a bat, a lion. (u या स्वराचा उच्चार हा अ असेल तिथे an व इतर ठिकाणी a वापरतात. उदा. an umbrella आणि a unity, a university)

  
2) उच्चारानुसार vowel अर्थात स्वर अक्षराने सुरू होणाऱ्या noun च्या अगोदर an हे article वापरतात. (a, e, i, o, u हे इंग्रजी भाषेतील पाच स्वर आहेत) व्यंजन सुरुवातीला असूनही काही शब्दांचे उच्चार स्वराने (नंतर असलेला) होतात म्हणून त्यांनाही an वापरतात. उदा. an honest.


3) जगात एकमेव असणारे noun, तसेच वाक्यात यापूर्वी ज्या noun चा उल्लेख झाला आहे आणि परत एकदा ते noun आले आहे अशा वेळी The या article चा वापर करतात. 

चला तर मग, द्या ही परीक्षा आणि तपासा तुमचे ज्ञान!

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

Jumbled sentences! हे सहज जमेल तुम्हाला!!


तुमच्या ओळखीच्या वाक्यातील शब्दांना एका खोडकर मुलाने विस्कटून टाकली आहेत. त्या शब्दांना त्यांच्या योग्य जागा दिल्या की होतील तुमच्या ओळखीचे वाक्य तयार! द्वितीय सत्र परीक्षेचा करू या सराव ! 
  1. वाक्यातील पहिले अक्षर कॅपिटल काढण्यास विसरू नका. 
  2. वाक्य संपल्यानंतर फुल स्टॉप द्या. 

मंगळवार, १२ मार्च, २०२४

Jumbled Words! द्वितीय सत्र परीक्षेचा करू या सराव !




तुमच्या ओळखीच्या शब्दातील अक्षरे एका खोडकर मुलाने इकडे - तिकडे केली आहेत. त्या अक्षरांना त्यांच्या योग्य जागा दिल्या की होतील तुमच्या ओळखीचे शब्द तयार! द्वितीय सत्र परीक्षेचा करू या सराव ! 

  1. शब्दातील सर्व अक्षरे झाल्यानंतर स्पेस देऊ नका.
  2. सर्व अक्षरे स्मॉल लिहा. 




सोमवार, ११ मार्च, २०२४

Personal Pronouns: Fill in the blanks.

 




Personal Pronouns दिलेल्या तक्त्यातून तुम्हाला सहज लक्षात येतील आणि चूक - बरोबर दाखवून मार्क देणारी टेस्ट सोडवली की तुमचा अभ्यास होईल अजून पक्का! 

रविवार, १० मार्च, २०२४

चला नीट लिहा बरं ही वाक्ये!


 

Present Tense and Present Continuous Tense मधील चुकलेली वाक्य दुरुस्त करताना तुमचा छान अभ्यास होईल. 

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

स्कॉलर केजी स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त विविध स्पर्धा संपन्न - टीव्ही- मोबाईल टाळा ॲड. सौ गित्ते

 

टीव्हीवर चालणाऱ्या मालिका आणि मोबाईलचा अतिवापर यामूळे संसारामध्ये विसंवाद निर्माण होत आहेत त्यामुळे महिलांनी शक्यतो या वेळेचा सदुपयोग आपल्या कलेला वाव देण्यासाठी, स्वतःला समृद्ध करण्यासाठी - नवे काही शिकण्यात घालवावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट शुभांगी गित्ते यांनी केले.


स्कॉलर केजी स्कूल या ठिकाणी महिला दिनानिमित्त त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की टीव्हीवरील अनेक मालिका आपल्या संस्कृतीला धरून नाहीत. संसार करत असताना किंवा तुम्ही जिथे कुठे असाल तिथे सामंजस्याने वागल्यास सर्व काही ठीक होते. कोर्टाची पायरी चढण्याची वेळ येऊ देऊ नका, असेही त्यांनी सांगितले. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला पालकांनी आनंदाने हवेत फुगे उडवून कार्यक्रमाची सुरुवात केली.  पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाल्यानंतर ॲड शुभांगी  गित्ते यांचे स्वागत स्पर्धेच्या परीक्षक सौ शोभा फुटके यांनी केले. शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांनी प्रास्ताविक केले. स्कॉलर केजी स्कूलमध्ये वर्षभर होणाऱ्या उपक्रमांची आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती देत त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. 


प्रमुख अतिथींच्या सविस्तर मार्गदर्शनानंतर महिला पालकांना आवडणारे खेळ होम मिनिस्टर अंतर्गत घेण्यात आले ज्यात संगीत खुर्ची, स्ट्रॉने डोक्यावर फुल तयार करणे, प्रश्न उत्तर फेरी, कलागुण सादर करणे यांचा समावेश होता. या स्पर्धेत सौ स्वाती जयवंत कौले यांनी प्रथम, सौ अमृता जितेंद्र नव्हाडे यांनी द्वितीय, तर सौ सोनाली गजानन बेंडे यांनी तृतीय पारितोषिक मिळवले. 


काव्यवाचन स्पर्धेमध्ये सौ स्नेहा अमोल क्षीरसागर यांनी प्रथम, सौ शुभांगी महेश उदगीरकर यांनी द्वितीय तर सौ ज्ञानेश्वरी बोकन यांनी तृतीय क्रमांक मिळवला. 
या स्पर्धेचे परीक्षण सौ शोभा शांतलिंग फुटके व सौ प्राची प्रवीण फुटके यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ वर्षा लाड व सौ प्रणिता पाठक यांनी केले. आपले मनोगत व आभार प्रदर्शन सौ शोभा फुटके यांनी व्यक्त केले. यावेळी काही मजेशीर गेम घेण्यात आल्याने उपस्थित महिलांना आनंद वाटला. 


कार्यक्रमास शाळेतील महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सौ सुजाता फुटके यांच्या मार्गदर्शनाखाली सौ वर्षा लाड, सौ प्रणिता पाठक, सौ प्रियंका कुलकर्णी, सौ राजश्री हलकंचे, सौ भाग्यशाली शिंदे, सौ सुनैना गुट्टे यांनी परिश्रम घेतले.