शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

NMMS विज्ञान सराव परीक्षा Part 2

 ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. Part 2: NMMS विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचा सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा. 

बुधवार, २३ नोव्हेंबर, २०२२

NMMS विज्ञान सराव परीक्षा Part 1

 इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. NMMS विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांचा सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.  

मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

अशी करून द्या कुटुंबातील सदस्यांची इंग्रजीत ओळख Introduction of Family members

 

Helpful sentences for family introduction आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख करून देताना उपयुक्त असलेली काही English वाक्ये खाली दिली आहेत. 


At first पहिले वाक्य खालीलपैकी कोणतेही एक घेऊ शकता 
"I would like to introduce you....."
"It's a pleasure to introduce..."
"I would like to introduce..."
"I would like to present..."
"May I introduce..."
"May I present..."
"This is..."


Her/His name ....  तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा  
Her/his name is...
She/he is ....


Age .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचे वय सांगा
Her/his age is ..
She/he is ..... Years old.
She/he is 35.


Profession .... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीचा व्यवसाय सांगा
She is a home maker.
She/He is farmer/business man/service man/shopkeeper....


Way of work.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीची काम करण्याची खुबी/खास पद्धत (चांगले गुण) सांगा
He/She is a hardworking person.
She/he works day and night......


Hobbies/qualities.... तुम्ही ओळख करून देत असलेल्या व्यक्तीच्या स्वभावातील काही गुण/वैशिष्ट्ये तसेच त्यांना असणाऱ्या चांगल्या सवयी, छंद सांगा
She/He is good at ..... 
She/he is a very cooperative person. 
He/she motivates us to do good things. Study more. 


End... परिचयाचा शेवट असा करा... 
I like...
I love.... 


Remember लक्षात ठेवा - बहुतके वेळा यात तुम्ही साध्या वर्तमान काळाचा उपयोग करत असता. 
You are using simple present tense mostly. 
Formula: Subject + verb (s for singular subject) + object


All the best 👍
वरील मुद्द्यांच्या आधारे आपल्या कुटुंबातील सदस्यांची ओळख आपल्या वर्गमित्रांना करून द्या. 

नमुन्यादाखल असलेला व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
https://youtu.be/r2x5nAqzm3k

NMMS नागरिकशास्त्र सराव परीक्षा

 
 इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. NMMS नागरिकशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांचा सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.  



सोमवार, २१ नोव्हेंबर, २०२२

NMMS सराव परीक्षा : इतिहास

इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. काही दिवस त्यांच्या हातात आहेत. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. NMMS इतिहास विषयातील आपला सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.       

रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

हे आहेत आपले समाज मित्र! Artisans : कुशल कामगार


इंग्रजी विषयात विविध वाक्य बनवण्यासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेत तुम्हाला गरज पडेल अशी माहिती.... 
Artisans : कुशल कामगार 
Artisans = A skilled worker, craftsman
  •   Businessman - व्यवसायिक 
• Baker -------------- बेकरीवाला 
• Barber ------------- न्हावी 
• Blacksmith ------- लोहार
• Bookseller -------- पुस्तक विक्रेता 
• Butcher ------------ खाटिक
• Carpenter --------- सुतार
• Chemist ------------ औषध विक्रेता
• Clerk ---------------- कारकून
• Cobbler ------------ चांभार
• Conductor --------- वाहक
• Confectioner –---- हलवाई
• Cook ---------------- अचारी
• Dentist ------------- दंतवैद्य
• Doctor -------------- डॉक्टर, वैद्य
• Doorkeeper ------- द्वारपाल
• Driver --------------- चालक
• Electrician --------- विजतंत्री
• Engineer ----------- अभियंता 
• Farmer ------------- शेतकरी
• Fireman 
• Florist -------------- फुलविक्रेता 
• Fruit seller -------- फळ विक्रेता, फळवाला
• Gardner ----------- माळी
• Gold smith ------- सोनार 
• Green Grocer /
   Vegetable seller --  भाजी विक्रेता
   Vegetable stall --- भाज्याचे दुकान
 • Grocer ------------- किराणा दुकानदार
    Grocery shop ----- किराणा दुकान
• Judge ---------------- न्यायधीश 
• Lawyer --------------- वकील
• Mason --------------- गवंडी
• Milkman ------------ गवळी
   Milkmaid ------------ गवळण
• Nurse --------------- परिचारिका
• Oilman -------------- तेली
• Patient -------------- रोगी
• Pilot ------------------ विमान चालक
• Plumber ------------- नळ दुरूस्ती करणारा
• Policeman ---------- पोलिस
   Civil police 
   Traffic police 
• Porter ----------------- हमाल 
• Postman -------------- पोष्टमन 
 • Principal -------------- प्राचार्य 
• Sailor ------------------- नाविक
• Soldier ----------------- सैनिक 
• Stone Carver/sculptor मुर्तिकार 
• Stone breaker -------- पाथरवट
• Sweeper ---------------- झाडूवाला 
• Tailor --------------------- शिंपी 
• Teacher ------------------ शिक्षक/शिक्षिका 
• Typist -----------           टंकलेखक
• Washer man ------------ धोबी laundryman
• Watchmaker ----------- घड्याळजी
• Watchmen -------------- सुरक्षा रक्षक
• Weaver ------------------- विनकर
   Handloom ---------------- हातमाग
   Power loom -------------- यंत्रमाग
• Welder -------------------- जोडारी
• Wireman ------------------ तारतंत्री

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची सराव परीक्षा : भूगोल


इयत्ता ८ वी तील विद्यार्थ्यांसाठी NMMS ची परीक्षा आहे. त्यांचा सराव व्हावा म्हणून गुगल फॉर्मच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या या पेपरमध्ये बरोबर उत्तर सांगण्याची व मार्क्स देण्याची सेटिंग केली आहे. भूगोल विषयातील आपला सराव यातून चांगला होईल ही अपेक्षा. कृपया ही लिंक इतर विद्यार्थ्यांना पाठवा.                   

 

मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

असा झाला मजेदार बालदिन! व्हिडिओ लिंक शेवटी अवश्य पहा



शिक्षकांची भूमिका आता आधुनिक काळानुसार बदलण्याची अपेक्षा शिक्षण क्षेत्राने केलेली आहे, काल दिनांक 14.11.2022 रोजी बाल दिनाच्या कार्यक्रमांमध्ये शालेय मंत्रिमंडळाने दोन दिवस अगोदर नियोजन करून जो कार्यक्रम सादर केला त्यातून आमच्याही असे लक्षात आले की आता खरोखरच आम्ही सुलभक अर्थात फॅसिलिटेटरच्या (Facilitator) भूमिकेत हळूहळू जात आहोत.
शालेय परिसरामध्ये आणि शाळेत जे साहित्य उपलब्ध आहे त्यातून विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षण घेणे अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षण घेण्याची इच्छा निर्माण व्हावी  अशा प्रकारची वातावरण निर्मिती आणि आवश्यक साहित्याची निर्मिती मात्र शिक्षकांनी स्वतः केली पाहिजे. अनेक प्रशिक्षणामधून शिक्षकांना वारंवार सांगितले जाते.. 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना केल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत आणि हे विद्यार्थी सक्षमपणे या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत... आवश्यक त्या ठिकाणी शिक्षकांना मार्गदर्शनाची गरज पडते, तिथे ते शिक्षकांचे मार्गदर्शन घेत आहेत. खेळांच्या तासाचे नियोजन, त्याच्या साहित्याचे नियोजन, परिपाठाचे नियोजन, वर्षभर होणाऱ्या विविध स्पर्धांचे नियोजन, वाचनालयाचे नियोजन शालेय विद्यार्थ्यांच्या बँकेचे नियोजन आणि अधून मधून होणाऱ्या अशा प्रसंगी कार्यक्रमाचे नियोजन.... हे सर्वच शालेय मंत्रिमंडळाची विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत..
शालेय मंत्रिमंडळाने 10 नोव्हेंबर रोजी बाल दिनाची संपूर्ण तयारी केली. एका बैठकीमध्ये त्यांनी प्रत्येक मंत्र्याला वेगवेगळी जबाबदारी दिली, खेळ, शिस्त, बक्षिसे खेळांची वेगवेगळी रचना, गोंधळ होणार नाही यासाठी सर्वांनी मिळून सर्वांना कशी मदत करायची हे सर्वजण बैठकीत चर्चा करत होते त्यावेळी माझी उपस्थिती होती... या वयात तुम्ही सर्व जबाबदाऱ्या अगदी सहजपणे पार पाडत आहात याचा आनंद आहे... मंत्र्यांनो असेच समृद्ध व्हा सक्षम व्हा आणि एक दिवस खरोखरच देशाचा कारभार सांभाळा हीच देशाची पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी प्रार्थना! 
- चंद्रशेखर फुटके
या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/UTSvr7PrMbM


सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

आरतीचा सन्मान गावकऱ्यांच्या उपस्थितीत





        जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थिनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता 8 वी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळवून पात्र झाल्याबद्दल गावचे उपसरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या वतीने आयोजित नगर भोजन कार्यक्रमात आदरणीय  ह भ प श्री वैराग्यमूर्ती प्रभाकर महाराज  झोलकर  यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन कुमारी आरती तुकाराम गुट्टे हिचा सन्मान करण्यात आला. गावात असणाऱ्या ग्रामदैवत श्री गोदमेश्वर मंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपसरपंच श्री बंडू गुट्टे, मार्गदर्शक शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके व मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड यांची उपस्थिती होती. शेकडो ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आरतीचे कौतुक केले. अनेकांनी तिला 'फक्त शाळेतील शिकवणीवर' हे यश मिळवल्याबद्दल शाबासकी दिली.       पंचक्रोशीतील अनेक पुरुष, महिला भाविक मोठ्या संख्येने किर्तन व नगर भोजन कार्यक्रमास उपस्थित होते.   

बाल दिनानिमित्त आयोजित विविध मजेदार खेळ

     

उपसरपंच श्री बंडू गुट्टे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन 

बकेट बॉल गेम 












शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त अर्थात बाल दिनानिमित्त वेगवेगळ्या अशा मजेदार स्पर्धांचे आयोजन केले होते. या सर्व खेळांची नियोजन मंत्रिमंडळातील विद्यार्थ्यांनी स्वतः केले. चार दिवस अगोदर मंत्रिमंडळाची बैठक झाली व त्यामध्ये त्यांनी कोणते खेळ घ्यायचे, कोणाची जबाबदारी असेल, ते कसे घ्यायचे, त्यासाठी लागणारे साहित्य, खेळ घेण्याची जागा, खेळाची वेळ या सर्व बाबींचा विचार करून अतिशय सुंदर पद्धतीने आज खेळ घेतले. 

     सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार शिक्षणप्रेमी नागरिक श्री बंडू गुट्टे यांच्या हस्ते अर्पण केला व सर्व शिक्षक वृंदांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. 

          पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विषयी शालेय मंत्रिमंडळाचे सदस्य चि श्रीनाथ गुट्टे आणि कोमल गुट्टे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यमंत्री चि व्यंकटेश गुट्टे याने केले. 


   त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वर्गवार आयोजित झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेचा आनंद घेतला. संगीत खुर्ची संपल्यानंतर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी बकेट बॉल स्पर्धा, बदकाला डोळा लावणे स्पर्धा, मटकी फोड स्पर्धा, शिवाजी म्हणतो पळापळा स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित रांगा लावून या वेगवेगळ्या स्पर्धांचा आनंद घेतला. प्रत्येक ठिकाणी यासाठी खास नियम बनवण्यात आलेली होती व छोटे छोटे बक्षीसही देण्यात येत होती. 


      शालेय मंत्रिमंडळांनी या स्पर्धेचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड सहशिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, सरोजकुमार तरुडे, श्रीमती प्रिया काळे व शुभांगी चट यांनी त्यांचे अभिनंदन केले.