बुधवार, ९ एप्रिल, २०१४

7 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ 2014 : प्रा शाळा टोकवाडी














                                                                



                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                     आज आमच्या शाळेत ७ वी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री काळे बाळासाहेब हे तर अतिथी म्हणून सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होत्या. श्रीमती जोशी रेखा यांनी ' या लाडक्या मुलानो, तुम्ही मला आधार' हे गीत सादर करून खास सुरूवात केली. ६ वी वर्गाच्या वतीने हा समारंभ आयोजित केला गेला.
या वेळी श्रीमती कराड वंदना, वर्गशिक्षिका श्रीमती सरिता महाजन यांनी आपल्या भावना व्यकत केल्या.
७ वी वर्गातर्फे शाळेला एक फ्लोवरपॉट व एक टेबलक्लोथ भेट देण्यात आला.
श्री काळे यांच्या मार्गदर्शनानंतर अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपला. सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर फुटके यांनी केले.

मंगळवार, १८ मार्च, २०१४

शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र,बक्षिस वितरण सोहळा व प्रकल्प प्रदर्शन

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे इंडिया सिमेंट कंपनीच्या वतीने गरजू महिला व शाळेतील मुलींना शिकवण्यासाठी शिलाई मशिन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा व प्रकल्प प्रदर्शनही यावेळी ठेवण्यात आले होते. इंडिया सिमेंट कंपनीचे अग्रवाल साहेब, काबरा साहेब, खान साहेब, टोकवाडीचे उपसरपंच बालाजी मुंडे, वाल्मिक मुंडे, केंद्रप्रमुख पल्लेवाड सर यांची उपस्थिती होती.







रविवार, २६ जानेवारी, २०१४

स्वर्गीय गोदावरीबाई हालगे (थोरल्या) स्मृति पुरस्कार विद्यार्थ्यांना प्रदान

  शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय  विज्ञान प्रदर्शन तालुका परळी मध्ये प्रथम क्रमांक मिळाला म्हणून आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडीचे  विद्यार्थी  चि. रोहित सुभाष रोडे व चि. धीरज मदन काळे या दोन मुलांना प्रत्येकी रुपये 500 स्वर्गीय गोदावरीबाई हालगे (थोरल्या) यांच्या स्मृति प्रित्यर्थ सौ. श्रद्धा नरेश हालगे यांनी जाहीर केले होते. ते आज आमच्या शाळेतील प्रजासत्ताक दिन 2014 कार्यक्रमात मुख्याध्यापक श्री निलेवाड यांच्या हस्ते देण्यात आले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक श्री चंद्रशेखर फुटके यांचे मार्गदर्शन लाभले. 

संत गाडगेबाबा यांनी प्रबोधन केल्याप्रमाणे
" खर्चू नका देवासाठी पैसा
शिक्षणाला पैसा तोच द्या हो,
नको मंदिराची करावया भर
छात्र जो हुशार त्यास द्यावा "

हालगे परिवाराचे मन:पूर्वक धन्यवाद.


प्रजासत्ताक दिन 2014 प्रा शाळा टोकवाडी























प्रा शाळा टोकवाडी येथून बदली होण्यापूर्वीचा शेवट चा प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन 2014

प्रजासत्ताक दिन माझ्या शाळेत विविध उपक्रमांनी साजरा झाला.
1 ली च्या मुलांनी रुमाल क्वायात, 2 री ने रीबीन कवायात, 3 री ने झेंडा कवायात, 4 थी डमब्लेस, 5 वी ते 7 वी मुलीने टिपरी डान्स, मुले लेझीम अशी रचना होती.
गावकरी उपस्थित होते.

300 विद्दर्थ्यांना पेस्ट व ब्रश वाटप








परळी डेंटल मेडीकल असोसिएशन, परळी मेडीकल असोसिएशन व कोलगेट कंपनी यांच्या वतीने वीटभट्टी कामगार मुलांची संख्या लक्षात घेवून 300 विद्दर्थ्यांना पेस्ट व ब्रश  वाटप करण्यात आले. यावेळी हभप भागवताचार्य डॉ. तुकाराम महाराज मुंडे, डॉ.राजाराम मुंडे,हभप रामेश्वर कोकाटे महाराज यांची उपस्थिती होती.

हा उपक्रम राबवण्यसठी सहकार्य करून हे  ब्रश मिळवून दिल्याबद्दल डॉक्टर श्री संतोष मुंडे, परळी यांचे सर्वांनी आभार मानले.

बुधवार, १५ जानेवारी, २०१४

श्री अंगद घुले सर यांचे मन:पूवर्वक आभार!


उदार अंतकरणाने शाळेच्या विविध उपक्रमासाठी नगदी रूपये 2000 मदत केल्याबद्दल श्री अंगद घुले सर यांचे मन:पूवर्वक आभार. श्री घुले सर यांच्यामुळे झेंडा कवायत, रुमाल कवायत व ढोलची दुरुस्ती झाली.

"हळदी-कुंकू" समारंभ 2014

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोकवाडी येथे आज सावित्रीबाई फुले जन्मोत्सवाचे अव्चित्य साधून लेक शिकवा अभियान अंतर्गत "हळदी-कुंकू" समारंभ घेण्यात आला...सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित "साक्षात आई होती..." हे गीत श्रीमती जोशी रेखा यांनी गाउन तसेच सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात केली.
मुलींना का शिकवावे, त्यांचे शिकवणे का थांबवु नये अशी छान भाषणे 6 वी, 7 वी वर्गातील मुली करत होत्या..आपल्या मुली किती छान बोलतात हे "आई" लक्ष्य देऊन एकत होत्या.
श्रीमती वाघमारे ज्योती यांनी मुलींचे शिक्षण कसे महत्वाचे हे पटवून दिले.
"मुलीचे लग्न 18 वर्षाच्या आधी करणार नाही, त्यांना मुलापेक्षा कमी समजणार नाही" अशी शपथ उपस्थित महिलांना श्रीमती महाजन यांनी दिली.
श्रीमती महाजन, श्रीमती कराड, श्रीमती जाधव, श्रीमती घाडगे यांनी सर्व महिलांचे स्वागत केले.
वक्तृत्व स्पर्धेतील मुलींना पाहुणे व मुख्याध्यपाक श्री निलेवाड अशोक यांच्या हस्ते बक्षीस दिले गेले.
दारात छान रांगोळी, मुलींची छान भाषणे सर्व मॅडम यांनी केलेले उद्बोधन पाहून गावातील महिला आनंदी दिसत होत्या.

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

श्री अनंत सोपान निकते सर यांचा निरोप समारंभ...







श्री अनंत सोपान निकते सर यांनी इतिहास, भूगोल हे विषय शिकवले पण त्याच बरोबर शालेय मंत्री मंडळ फार छान सांभाळले..भाषण कशी करावीत हे त्यांनी फार मस्त शिकवले..त्यांच्या कार्यकाळात अनेक बक्षीस शाळेला मिळाली..विशेष म्हणजे परळी येथील तालुकास्तरावरचे रुपये 3000 चे बक्षीस.. आपले काम वेळेवर करणे आणि प्रत्येक काम निष्ठेने पूर्ण करणे हा त्यांचा स्वभाव. उपक्रमाचे रेकॉर्ड कसे ठेवावे हेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. पुस्तके वाचणे आणि वाचावीत असा आग्रह सहकारी शिक्षक व विध्यर्थि यांना ते करतात.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची मुख्यमंत्री कुमारी पल्लवी काळे हिने केले. स्वागत गीत श्रीमती घाडगे यांनी गायले. श्री काळे, श्री फुटके यांनी मनोगत व्यक्त केले. आभार श्रीमती रेखा जोशी यांनी मानले.
सरांनी शाळेला खूप दिले आहे..जाताना घड्याळ देऊन वेळ कशी म्हत्वचि हे सांगितले..